Breaking News

उध्दव ठाकरेंनी दिले शिंदे गटाला आव्हान,.. मैदानात उतरा, कोण जिंकतो ते बघुया आयोगाच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केली गर्दी

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. आज दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले. त्यावेळी मातोश्रीबाहेर …

Read More »

वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंचा तो निर्णय योग्य सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयाचे स्वागत

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

निवडणूक आयोगाच्या निकालावर कायदेतज्ञ बापट म्हणाले, आयोगाने मोठी चूक केली सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकालाआधीच आयोगाचा निकाल

एकाबाजूला सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा याचिकेवर आणि विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकार प्रश्नी याचिका प्रलंबित आहेत. या याचिकांवर २१ फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु होणार आहे. मात्र न्यायालयाच्या या निकालाआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यावर शिवसेना आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्य बाणाबाबत एकनाथ शिंदे …

Read More »

शिंदेंच्या त्या टीकेवर सुषमा अंधारे म्हणाल्या,…तर एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण भाजपाकडे गहाण उध्दव ठाकरेंवर केलेल्या आत्मपरिक्षणाच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात लोकशाही नसल्याचे दिसून येत असल्याचे कारण पुढे करत आणि शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना आत्मपरिक्षण करण्याचा खोचक सल्ला …

Read More »

नाना पटोलेंचा खोचक सवाल, देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने? नाव आणि चिन्ह काढून घेतलं तरी जनतेचा आशिर्वाद कसा काढून घेणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा …

Read More »

आयोगाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो… बाळासाहेबांचा विचार तीच खरी शिवसेना

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळींचं अभिनंदन करत होतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार …

Read More »

निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आयोगाने शेण खाल्ल, मग इतका खटाटोप कशासाठी? मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून जाहिरच करावं

एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका मांडताना केंद्रिय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका …

Read More »

आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीचा आणि राज्यघटनेचा हा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय...

आज दिवसभरात उध्दव ठाकरे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाने पहिला धक्का दिल्यानंतर संध्याकाळी केंद्रिय निवडणूक आयोगाने दुसरा धक्का देत शिवसेना हे पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. या निकालानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आनंद …

Read More »

मोठी बातमीः या एका चुकीमुळे ठाकरेंची शिवसेना- धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाः वाचा निकालपत्र निवडणूक आयोगाने ७८ पानी निकालपत्रात दिली सविस्तर कारणे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला. त्यावर उध्दव ठाकरे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देवू नये अशी मागणी केली. …

Read More »

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,… त्यांनाच विचारण्याची गरज त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायचं नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्यासोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. त्यानंतर गणित काय बदलली हे अजित पवार …

Read More »