Breaking News

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,… त्यांनाच विचारण्याची गरज त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायचं नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्यासोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. त्यानंतर गणित काय बदलली हे अजित पवार यांनाच विचारा असा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकिय विश्वासहार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. फडणवीसांच्या या दाव्याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावं असं मला वाटत नाही. त्यांनी इतक्या दिवसांनी यावर वक्तव्य का केलं हे त्यांनाच विचारण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य करत अप्रत्यक्ष फडणवीस यांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, उमेदवार मला भेटले होते. त्यांनी एखादी चक्कर टाका असं सांगितलं. त्यामुळे विचार करू. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी गेलो, कसब्यातही जावं लागेल. एका ठिकाणी गेलं तर दोन्ही ठिकाणी जावं लागतं, असे सांगत कसबा पेठेतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला जाणार असल्याचे संकेत दिले.

आसामने ज्योतिर्लिंग भीमाशंकरला नाही, तर आमच्याकडे असल्याचा दावा केला. यावर शरद पवार म्हणाले, अवघ्या देशाला माहीत आहे की १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत. असं असताना ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यापेक्षा वेगळं काय सांगणार आहे.
गिरीश बापट यांना खरंच प्रचारात आणण्याची गरज होती का हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे, असं मत व्यक्त करत शरद पवारांनी गिरीश बापट यांना व्हिलचेअरवर आणून प्रचार केल्याबद्दल व्यक्त केलं.

शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचं मी ऐकलं. मंगळवारी काय होतं ते बघुयात. सध्या ‘इंटरेस्टिंग’ घडतं आहे. आत्ता काय होईल हे सांगणं अवघड आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *