Breaking News

नाना पटोलेंची मागणी, खतासाठी शेतकऱ्याला जात विचारणाऱ्यावर कारवाई करा पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून जात विचारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्याला जात विचारली जाते या मुदद्यावर …

Read More »

अजित पवारांचे आव्हान, किमान फडणवीसांनी घोषणा केल्याप्रमाणे तरी करावं… रोज आठ शेतकरी संपवतात जीवन- शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन

राज्यातील कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आश्वासन सरकार सभागृहात देत असले तरी फिल्डवर प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. खरं तर सरकारने कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हीच मागणी करत असत, मग …

Read More »

लोढांच्या लव्ह जिहादवक्तव्यावरून अबु आझमी, गुलाबराव पाटील यांच्यात झुंपली अखेर अजित पवार यांच्या सूचनेनंतर वाद थांबला

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात ८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खास महिला सदस्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत विशेष सत्र बोलविण्यात आले होते. यावेळी राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक विधान करत राज्यात लव्ह जिहादची १ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली …

Read More »

वर्षा गायकवाडांच्या प्रश्नावर मंत्री राठोडांची घोषणा, मुंबईतील मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचाही पुनर्विकास विधानसभेत लक्षवेधी सुचनेवरील चर्चेवेळी दिली माहिती

सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय गृहनिर्माण योजना राबविली जाते. लवकरच मंत्रीमंडळासमोर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनर्विकास धोरण आणण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील ४५ वर्षांपूर्वी मागासवर्गीयांसाठी बांधण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेच्या पुनर्विकास कामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. …

Read More »

खत खरेदीवेळी जातीची विचारणाः विरोधकांनी धारेवर धरताच अखेर सरकारची …. अजित पवार आणि नाना पटोले आक्रमक पवित्रा घेतल्या नंतर मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

आधीच नैसर्गिक संकटांमुळे आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या खताची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नावं नोंदवावी लागतात. मात्र नाव नोंदविताना ऑनलाईन पोर्टलवर संबधित शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याची माहिती पुढे आली. याच याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले असून याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेशः ईडी चौकशीची मागणी करणाऱ्या सोमय्यांचीच चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश

मागील काही वर्षापासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडी चौकशीची मागणी करतात आणि या यंत्रणेकडून लगेच चौकशीही सुरु होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ मविआकडून “भ्रमाचा भोपळा” आंदोलन बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणला

बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची खोचक टीका, गरजेल तो बरसेल काय यापेक्षा महाविकास आघाडीने मांडलेला अर्थसंकल्प चांगला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक टीका करत गरजेल तो बरसेल काय अशी टीका करत महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडले होते ते अभ्यासपूर्ण होते. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर का हलवा आहे …

Read More »

जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला, पुन्हा अर्थसंकल्प मांडायचा नाही, हा एकमेवच… जे शक्य नाही अशा गोष्टींची कमिटमेंट या सरकारने राज्यातील जनतेला करून घोषणांचा पाऊस पाडला...

आजचा अर्थसंकल्प १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थमंत्र्यांनी मांडला परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटीच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटीवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे दर्शन झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

महिला, विद्यार्थी, शिक्षणसेवक, आशा सेविकांसह या घटकांना अर्थसंकल्पातून मोठी खुषखबर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचे संकेत देत यापूर्वीच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याची पूर्तता आज अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी केल्याचेही दिसून आले. मागील अनेक वर्षापासून आशा सेविका, शिक्षणसेवक, शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या मानधन व शिष्यवृत्तीत मोठी वाढ केली. तसेच जन्माला आलेल्या मुलीसाठी बेटी बचाव अर्थात लेक लाडकीच्या सरकारी अनुदानात वाढ …

Read More »