Breaking News

राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर, त्यांचा विश्वास ४० टक्के कमिशनवर मोफत देण्याच्या आश्वासनावरील टीकेवर पंतप्रधान मोदींची टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी पार पडली जाणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांच्यात लढाई होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्यातच काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका …

Read More »

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळलीः दोघांचा मृत्यू तर ७ जण जखमी ४० ते ५० नागरीक अडकल्याची भीती

भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा दाखवून देणारा ७५ बाजार समित्या मविआच्या ताब्यात

बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी जयंत पाटील म्हणाले, गेल्या …

Read More »

नारायण राणे यांचा उध्दव ठाकरे यांना इशारा, येऊ द्या त्यांना कोकणात… ५ कोटी अॅडव्हान्स दिले ५०० कोटींचा व्यवहार झाला

कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. याप्रकल्पावरून समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. नाणारमधील रिफायनरी रद्द झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसू जागेचा पर्याय दिला होता, असा दावा उदय सामंत यांनी केला. मात्र, आता बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेनेही विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी …

Read More »

उदय सामंत यांची बैठकीनंतर माहिती, बारसू प्रकरणी उध्दव ठाकरे यांना ब्रिफींग हवे असेल तर…. उद्योग मंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्यात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले. मात्र, हे माती परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पांगविण्यासाठी महिला, मुलांसह सर्वांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे येथील परिस्थतीत तणाव निर्माण झाला. परंतु …

Read More »

महाराष्ट्र दिनाची मेट्रो प्रवाशांना अनोखी भेटः या व्यक्तींना मिळणार २५ टक्के सवलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन …

Read More »

मंत्री विखे-पाटील यांचे निर्देश, अवैध वाळू उपसा प्रतिबंधीत तर नवीन धोरणाची अंमलबजावणी करा महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी., असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा देशातील २२ राज्यांच्या राजधान्यांमध्ये साजरा करणार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

नवी मुंबई मेट्रोच्या कामास विलंब, खर्चात वाढ पण सिडकोकडून हाताची घडी तोंडावर बोट कंत्राटदारावर सिडको मेहरबानः खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ

१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आज १२ वर्ष उलटूनही नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु झाली नाही. या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कोठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याचा धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. …

Read More »

अजित पवार यांचा लोककलावंतांसाठी पुढाकार, आर्थिक विकास महामंडळ स्थापन्यासाठी सरकारला पत्र लोककलावंतांना वृद्धापकाळात निवास, भोजन, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी महामंडळ आवश्यक...

महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, लोक कलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी …

Read More »