Breaking News

टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, …

Read More »

त्या सगळ्या चर्चांवर भाजपा म्हणते, …त्यानंतर या बातम्यांना पेव फुटले अजित पवार यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असे वक्तव्य करणार नाही

मागील चार-पाच दिवसाहून अधिक काळ अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला. त्यावर शिंदे गटातील आमदार नेत्यांबरोबरच मंत्र्यांनीही अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील सदरामधून काही संदर्भ देत अजित …

Read More »

संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, खरे तर भाजपाला राग यायला पाहिजे, इतरांना नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, पक्ष सोडण्यासाठी किती जणांवर दबाव

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात जाणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असा इशारा संजय राऊत यांचं नाव न घेता दिला. यानंतर आता संजय राऊत यांनी …

Read More »

जार ने पाणी विकताय परवानगी घेतली का ? ; आता ‘ही’ वाहने होणार शासन जमा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची माहिती

स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहक जार मधून पाणी विकत घेतात. या पाण्याची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. या जार मधुन पाणी विकणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घावी लागणार आहे. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची …

Read More »

अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली

मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी …

Read More »

काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,…ती दोन माकडं पोसलीत विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचे काम सुरुय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी १८ एप्रिल रोजी अकोला येथे पत्रकारांनी …

Read More »

राज्यातील शाळा १५ जून पासून पण विदर्भातील ‘या’ तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात …

Read More »

महात्मा फुले महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करा तीन लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत …

Read More »

‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

“राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे”, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. केंद्र शासन पुरस्कृत ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२३ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या …

Read More »

सटाण्याच्या माजी नगराध्यक्षांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांमुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपाकडे ओढा वाढला आहे, असे प्रतिपादन भारतीय़ जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलते होते. खा.सुभाष भामरे, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित …

Read More »