Breaking News

त्या सगळ्या चर्चांवर भाजपा म्हणते, …त्यानंतर या बातम्यांना पेव फुटले अजित पवार यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असे वक्तव्य करणार नाही

मागील चार-पाच दिवसाहून अधिक काळ अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला. त्यावर शिंदे गटातील आमदार नेत्यांबरोबरच मंत्र्यांनीही अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील सदरामधून काही संदर्भ देत अजित पवार हे भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी या सर्व चर्चा तथ्यहीन असल्याचे सांगत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या मुखपत्रातून त्यांच्या पक्षाविषयी बोलावे आणि आमच्या पक्षाचे वकिल पत्र कोणाले दिले नाही आमची बाजू मांडायला आमचे प्रवक्ते आणि नेते खंबीर असल्याचे सांगत संजय राऊत यांना सुनावले. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता या सगळ्या गोष्टींचे खापर संजय राऊत यांच्या माथी मारले.

अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या बातम्या पसरवण्यात संजय राऊतांची भूमिका आहे का? या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुरुवात तर संजय राऊतांनीच केली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांना जाऊन भेटले. त्यानंतर या बातम्यांना पेव फुटले. त्यामुळे अजित पवारांनी स्पष्ट केलं की, सुरुवात कुणी केली. त्यामुळे संजय राऊत शरद पवारांचं ऐकतात की आणखी कुणाचं ऐकतात याबद्दल मला काही बोलायचं नाही असे सांगत या वादात पडणार नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून अजित पवारांचं प्रतिमाहनन करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याला दुसरे कुणी जबाबदार नाहीत. महाविकास आघाडीतूनच असे प्रयत्न सुरू असतील, असा आरोपही केला.
पक्षफुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी कालही स्पष्ट केलं आहे की, भाजपाकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या नेतृत्वावर वारंवार कोण प्रश्न उपस्थित करत आहे हे त्यांनीच तपासलं पाहिजे.

आमच्याकडून अशी कोणतीही चर्चा नाही. मी अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागेल किंवा जी गोष्ट घडलीच नाही त्याविषयी मी चुकीची माहिती सांगणार नाही. कुणीच अशी चुकीची माहिती देऊ नये. अजित पवारांनी भाजपाशी कोणताही संपर्क केलेला नाही. भाजपाही त्यांच्या संपर्कात नाही. कपोलकल्पित बातम्या तयार होत आहेत. अजित पवारांचे विरोधक या बातम्या तयार करत असतील, असा आरोप बावनकुळेंनी केला.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *