Breaking News

लोकसभा हाऊस कमिटीच्या पत्राला राहुल गांधी यांनी ‘हे’ दिले खोचक उत्तर माझ्या अधिकाराबाबत कोणतीही गोष्ट आडवी न येता तुमच्या पत्रातील बाबींचे पालन करेल

सूरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केंद्रातील मोदी सरकारने राहुल गांधी यांना कोणतीही संधी न देता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचे आदेश जारी केले. त्यानंतर लगेच खासदारांसाठी असलेला बंगलाही रिक्त करण्याची नोटीस लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना बजावली. या साऱ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पहिल्यांदाच लोकसभा हाऊस …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, …लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाकडे उत्तर नाही

भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

‘पन्नास खोके,… ‘ घोषणेप्रकरणी राहुल शेवाळे न्यायालयात, तिघांना हजर राहण्याचे आदेश संजय राऊत, आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांना न्यायालयाची नोटीस

महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना पन्नास खोके एकदम ओके ही विरोधकांनी दिलेली घोषणा घराघरात पोहोचली. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेकडून सातत्याने याच घोषणेच्या आधार घेत त्या अनुषंगाने पत्रकार परिषदांमधून आरोपही करण्यात आले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या घोषणे विकत घेतलेला न्याय असा आरोप ठाकरे गटाच्या …

Read More »

भाजपा – शिवसेना (शिंदे गट) तर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) तर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर …

Read More »

स्वा.सावरकरांच्या प्रेमापायी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर, मात्र न्यायासाठी ३ चा मंत्रालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न काल दिवसभरात एक अपंगासह दोन महिलांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न अखेर एकीची प्राण ज्योत मालवली

राज्यात सध्या सावकरप्रेमी आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ज्या हिंदूत्ववाद्यांचे सरकार असल्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येतो त्याच हिंदू धर्मिय तीन व्यक्तींकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयासमोर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एका महिलेचा …

Read More »

आधार-पॅन लिंक करायचे राहून गेले? आता या तारखेपर्यंत लिंक करा ३१ मार्चची मुदत आता ३० जून पर्यंत वाढविली

देशातील करदात्या नागरीकांची माहिती एकाच कार्डाद्वारे उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून पॅनकार्डधारक आणि आधार कार्डधारकांचा डेटा एकच असावा या उद्देशाना पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी आयकर विभागाने ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारकार्डाशी लिंक करण्याची मुदत देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक नागरिकांकडून या …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल, म्हणजे नेमके काय करणार? सावरकरांचा अपमान झाल्या तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प

काल मालेगांव येथे झालेल्या जाहिर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वा.सावरकर प्रश्नावरून इशारा दिला. त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचा फोटो दाखवत उध्दव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प होते, …

Read More »

खासदारकी रद्द नंतर आता लोकसभेने पुन्हा बजावली राहुल गांधी यांना नोटीस न्यायालयाच्या निकालानंतर कोणतीही संधी न देता आता घर खाली करण्याची नोटीस बजावली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टिप्पणी करताना सगळे चोर मोदीच का असतात? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर गुजरातमधील भाजपाच्या माजी आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यावर गुजरातमधील सूरत …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितले महाविकास आघाडीच्या विजयाचे रहस्य, भाजपाची खरी ताकद… निष्ठावान शिवसैनिक भाजपा विरोधात

शिवसेना भाजपासोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपाला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपाची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपाने केले. त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपाविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपाला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळानिश्चितीसाठी ‘या’ सदस्यांची समिती नियुक्त स्मारकासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती पुतळा निश्चितीचे काम करणार आहे

दादर येथील इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत असून सुमारे ४५० फूट उंचीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य-दिव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे पुतळा निश्चितीसाठी समिती नियुक्त करण्यात आली …

Read More »