Breaking News

महिला, विद्यार्थी, शिक्षणसेवक, आशा सेविकांसह या घटकांना अर्थसंकल्पातून मोठी खुषखबर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचे संकेत देत यापूर्वीच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याची पूर्तता आज अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी केल्याचेही दिसून आले. मागील अनेक वर्षापासून आशा सेविका, शिक्षणसेवक, शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या मानधन व शिष्यवृत्तीत मोठी वाढ केली. तसेच जन्माला आलेल्या मुलीसाठी बेटी बचाव अर्थात लेक लाडकीच्या सरकारी अनुदानात वाढ केली. याशिवाय राज्यातील सर्व महिलांना एसटीने प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत जाहिर केली. तसेच काही अल्पसंख्याक समाजासाठीही नव्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

असंघटित कामगार/कारागिर/ टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी, अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांच्या शिष्यवृत्तीतही भरघोस वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. याशिवाय सर्व वंचित घटकातील नागरिकांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

अर्थसंकल्पातून या वर्गाला दिली खुशखबरः-

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ-विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
– ५ ते ७ वी : १००० वरुन ५००० रुपये
– ८ ते १० वी : १५०० वरुन ७५०० रुपये
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी १० हजार रुपयांची वाढ
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : ६००० वरुन १६,००० रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : ८००० वरुन १८,००० रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : ९००० वरुन २०,००० रुपये
– पीएमश्री शाळा : ८१६ शाळा/ ५ वर्षांत १५३४ कोटी रुपये

नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार
– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
– प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी देणार

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी…
– २५० शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
– अनुसूचित जमातीच्या १०० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती
……
अल्पसंख्यकांसाठी…
– अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यात ३००० बचतगटांची निर्मिती
– उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: २५,००० वरुन ५०,००० रुपये

सर्वांसाठी घरे…
यावर्षी १० लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षांत १० लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
– प्रधानमंत्री आवास योजना: ४ लाख घरे
(२.५ लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, १.५ लाख इतर प्रवर्ग)
– रमाई आवास : १.५ लाख घरे/१८०० कोटी रुपये
(किमान २५ हजार घरे मातंग समाजासाठी)
– शबरी, पारधी, आदिम आवास : १ लाख घरे/१२०० कोटी रुपये
– यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: ५०,००० घरे/ ६०० कोटी
(२५,००० घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : २५,००० घरे)
– इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : ३ वर्षांत १० लाख घरे / १२,००० कोटी रुपये
(या योजनेत यावर्षी ३ लाख घरे बांधणार/ ३६०० कोटी रुपये)

असंघटित कामगार/कारागिर/ टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी…
– ३ कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
– ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
– माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला २५ कोटी
– स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार

लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची…
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
– मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
– जन्मानंतर मुलीला ५००० रुपये
– पहिलीत ४००० रुपये, सहावीत ६००० रुपये
– अकरावीत ८००० रुपये
– मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये

सारे काही महिलांसाठी…महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सुट
– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
– कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
– मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
– महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
– आशा स्वयंसेविकांचे मानधन ३५०० वरुन ५००० रुपये
– गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० वरुन ६२०० रुपये
– अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरुन १०,००० रुपये
– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरुन ७२०० रुपये
– अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरुन ५५०० रुपये
– अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २०,००० पदे भरणार
– अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

नोकरदार महिलांसाठी ५० वसतीगृहे,
दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना
– शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती
– अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
– या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
– या योजनेत ५० नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

पंचम अमृत एकूण : १३,४३७ कोटी रुपये
असे आहेत करप्रस्ताव…
– महिलांना आता मासिक २५,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त
– यापूर्वी ही मर्यादा मासिक १०,००० रुपये होती, ती आता २५,००० रुपये
– दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका

नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार
– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
– प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी देणार

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *