Breaking News

काँग्रेसकडून पत्रकार परिषदा घेत पंतप्रधान मोदींना दिले आव्हान, चौकशीची हिम्मत दाखवाच राहुल गांधींवरील कारवाई राजकीय आकसातून, लोकशाही संपण्याचा दिशेने देशाची वाटचाल : बाळासाहेब थोरात

मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीची माहिती मागितली म्हणून न्यायालयाने ठोठावला केजरीवालांना दंड माहिती आयोगाचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरवित दिला अजब निर्णय

मागील तीन-चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी आणि पदविकेचे शिक्षण गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापाठातून झाल्याची माहिती देण्यात येत आली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची प्रत मिळावी …

Read More »

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगत म्हणाले ,पंकजा सोबतही हेच घडतयं स्व.गोपीनाथ मुंडे यांचा भाजपाकडून छळ होत होता

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत परळी येथून माजी मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सातत्याने पंकजा मुंडे यांना सातत्याने भाजपाकडून डावलण्यात आल्याचे दिसून येत आले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आता आपण कोणासमोर झुकणार नाही असे वक्तव्य करत पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. मात्र …

Read More »

काँग्रेसची भीती, अदानीची महागडी वीज राज्यातील वीजग्राहकांचे कंबरडे मोडणार अदानी पॉवरकडून सध्याच्या वीजखरेदी दरापेक्षा दुप्पट दरवाढीचा प्रस्ताव

महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना आता वीज दरवाढीच्या संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. अदानी पॉवरने वीजदरात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणला सादर केला आहे. ही दरवाढ मान्य केल्यास राज्यातील वीज ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक बसणार आहे त्यामुळे भाजपा सरकारने या दरवाढीला मंजुरी देऊ नये, अशी मागणी प्रदेश काँग्रेस …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री… कामांना स्थगिती देण्याचे उद्योग केल्याचा केला निषेध

विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या …

Read More »

महाजनांच्या टीकेवर इम्तियाज जलील यांचा टोला, उच्च शिक्षित आहेत थोडी अक्कल असेल पण… छ्त्रपती संभाजीनगर किराडपुरा भागातील राड्यावरील आरोपाला प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री राडा झाला. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं जाळली, सामान्य नागरिकांची वाहनं जाळली, अनेक वाहनांची तोडफोडही केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यामुळे कालपासून किराडपुरात तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराला खासदार इम्तियाज जलील कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन …

Read More »

सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया, शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात…. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया …

Read More »

गतीमान सरकार…,च्या भ्रष्ट कारभाराची सरपंचानेच पंचायत समितीसमोर दोन लाख उधळत… मागेल त्याला विहिर योजना मंजूर करण्यासाठी १२ टक्के कमिशन शेतकऱ्यांकडे मागितल्याचा सरपंचाचा आरोप

नुकतेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टिपण्णी करत वाभाडे काढले. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या सरकार गतीमान वेगवान महाराष्ट्र या घोषवाक्यातील पोकळपणा गेवराई पायगाच्या सरपंचाने उघडकीस आणली. राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगरमधील फुलंब्री येथील पंचायत समितीतील कार्यालयातील …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, रामाचे नाव घेत सध्या दगड पाण्यावर तरंगतायत… धनुष्यबाण गेला तरी राम माझ्यासोबत

त्या काळी श्रीलंकेतील रावणाला हरविण्यासाठी रामसेतू बांधताना रामाच्या नावाने समुद्राच्या पाण्यात दगड टाकले जायचे आणि तरंगायचे असा रामनवमीचा संदर्भ देत आज रामाचे नाव घेत जे काही दगड तरंगताना दिसत आहेत ते केवळ दगड आहेत असा खोचक टोला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपाला लगावत पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत सरकार सकारात्मक

श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेवून या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व …

Read More »