Breaking News

आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीचा आणि राज्यघटनेचा हा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय...

आज दिवसभरात उध्दव ठाकरे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाने पहिला धक्का दिल्यानंतर संध्याकाळी केंद्रिय निवडणूक आयोगाने दुसरा धक्का देत शिवसेना हे पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. या निकालानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त करत म्हणाले, लोकशाहीचा आणि भारतीय राज्यघटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी देत आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. तसंच त्यांनी योग्य निर्णय घेतला आम्ही त्यांचे आभारही मानले.

आम्ही बंड केलं होतं त्यानंतर कायदेशीर लढाईही लढली. आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळी कागदपत्रं सादर केली होती. त्यानंतर हा निर्णय आला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाल्याचं सांगत सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आजच्या दिवसांपर्यंत शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना बघण्यास मिळाला. त्यानंतर आता हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असल्याचे ते म्हणाले.

आम्ही जी कागदपत्रं सादर केली होती त्यानंतर धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव आम्हाला मिळालं आहे. आम्ही नियमबाह्य काहीही केलेलं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय्य निर्णय दिला आहे. आज सत्याचा विजय झाला आहे. या निकालाने आम्हाला न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *