Breaking News

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादरः वाचा नव्या घोषणांचे अपटेड अनेक नव्या घोषणा, आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अनेक घोषणा

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवत सर्व घटकांना खुष करणारा अर्थसंकल्प २०२३-२४ चे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर करण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्पाची विभागनी दोन भागात करणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच जाहिर केले. अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा… छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे …

Read More »

राष्ट्रवादीचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना, अजित पवार आणि शिंदे गट भिडले विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल, शरद पवार म्हणतात जनतेला बदल हवाय ते हेच का?

राज्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून विधानसभेत करण्यात येत होती. मात्र मध्येच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील नागालँडमधील भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याचा मुद्दा उपस्थित करत हेच बदलाचे वारे …

Read More »

अजित पवारांची टीका, मंत्रिमंडळात एकही महिला नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ;सरकारने नराधमांवर जरब बसवावी...

महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर …

Read More »

राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ सादर

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे १४ …

Read More »

संजय राऊतांच्या विनंतीला मान देत विधानसभेने दिली मुदतवाढ, पण तारीख नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सभागृहात मुदतवाढीची घोषणा

राज्याच्या विधिमंडळाला ’चोरमंडळ’ असे संबोधल्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्र पाठवित सविस्तर खुलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर सविस्तर खुलासा सादर करण्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. मुदतवाढीनुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात …

Read More »

विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, मगरीचे अश्रू… अवकाळीचा आठ जिल्ह्यांना फटका; १३ हजार हेक्टरवर नुकसान

राज्यात अवकाळी पावसामुळे ८ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच राज्यात …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय …

Read More »

छगन भुजबळ, अजित पवारांचा हल्लाबोल, सरकार रंगाची होळी खेळत असताना… शेतकऱ्यांची 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा

अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली. गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तातडीने मदत जाहीर करा

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे हे कळले पाहिजे, संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत …

Read More »

देवस्थान जमिनप्रकरणी जयंत पाटील यांच्या प्रश्नावर फडणवीसांचे चार महिन्यात तपासाचे आश्वासन सरकार बदलताच तक्रारदाराचे संरक्षण काढत त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल

विधानसभेचे कामकाज सुरु होताच हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते. मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र …

Read More »