Breaking News

देवस्थान जमिनप्रकरणी जयंत पाटील यांच्या प्रश्नावर फडणवीसांचे चार महिन्यात तपासाचे आश्वासन सरकार बदलताच तक्रारदाराचे संरक्षण काढत त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल

विधानसभेचे कामकाज सुरु होताच हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते. मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अनेक हिंदू देवस्थानांच्या ट्रस्टच्या जमीनी हडप करण्याचा प्रकार घडला असल्याचे आज प्रश्नोत्तराच्या तासात जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

हिंदू देवस्थान जमीनीच्या या प्रकरणाचा तपास एसीबी करत आहे. मात्र एसीबीकडून चालढकल होत आहे. गुन्हेगाराला अटक करण्यात आली नाही. हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जमिनी हडप करणारे कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर देवस्थानांना जमिनी परत करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर ते किती शीघ्रगतीने काम करू शकतात हे याच प्रकरणातून दिसते. विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी १८ ऑगस्ट २०२२ ला तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आणि १९ ऑगस्ट २०२२ ला नव्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक झाली. जलद काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचे कौतुक असा चिमटा काढतानाच पण तपासही लवकर पूर्ण करा व दोषींना शासन करा असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जमीन हडपल्याप्रकरणी सुरू असलेला तपास येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या जातील. बीड जिल्ह्यातील ९४ देवस्थानाच्या जमीन खालसा करण्याच्या प्रकरणांचीही चौकशी केली जाईल, तसेच चुकीच्या पद्धतीने जमीनी हस्तांतरीत केल्या असतील तर त्या देवस्थानला परत कशा मिळतील याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही विधानसभेत उत्तर देताना सांगितले.

बीड तालुक्यात ६, बीड शहरात ६, धारुर तालुक्यात २, गेवराई १, आंबेजोगाई ३, आष्टी १२, माजलगाव १, केज १ अशी जमीनींची नवी प्रकरणे समोर येत आहेत. याची व्याप्ती वाढत असल्याने तपासाला वेळ लागत असल्याचे सांगून सरकार लवकरात लवकर आणि कडक कारवाई करेल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *