Breaking News

राष्ट्रवादीचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना, अजित पवार आणि शिंदे गट भिडले विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल, शरद पवार म्हणतात जनतेला बदल हवाय ते हेच का?

राज्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून विधानसभेत करण्यात येत होती. मात्र मध्येच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील नागालँडमधील भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याचा मुद्दा उपस्थित करत हेच बदलाचे वारे आहेत का असा सवाल उपस्थित करत तेथेही पन्नास खोके नागालँड सरकार ओके असे काही झाले आहे का याची चौकशी करण्याची गरज असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादीला लगावला. या वरून विधानसभेत अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच झुंपल्याचे दिसले.

त्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगेच तातडीने याप्रकरणी प्रत्युत्तर देत म्हणाले, राज्यात आणि केंद्रात तुमचे सरकार आहे. तुमच्या ताब्यात तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे तिथे खोके सरकार झालंय का किंवा नाही याची चौकशी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधायचं नसतं. तेथे नागालँडमधील राजकिय परिस्थिती वेगळी आहे. अनेकवेळा तेथील सर्वपक्षिय सरकार स्थापन करतात असेही स्पष्ट केले.

त्यानंतर छगन भुजबळ यांनी पॉंईट ऑफ ऑर्डरखाली मुद्दा उपस्थित करत नागालँडमधील सत्ता स्थापनेची चर्चा इथे कशाला असा सवाल करत राष्ट्रीयस्तरावर कोणत्या पक्षाने कोणाला पाठिंबा याचा इथे सभागृहाशी काय संबध असा सवालही उपस्थित केला.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजच्या सभागृहाच्या अजेंड्यावर खोके सरकार, बिके सरकारचा विषय आजच्या कामकाज पत्रिकेत नाही. त्यामुळे यावर आता चर्चा नको असे सांगत सत्ताधारी आणि विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन केले.

तेवढ्यात विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. त्यांनी हाच धागा पकडत बोलताना म्हणाले, मागील एक दोन दिवसांपासून शरद पवार साहेब हे सातत्याने जनतेत सध्या बदलाचे वारे वहात असल्याचे सांगत आहेत. तसेच निवडणूकीवेळी हे धनशक्तीचे आणि जातीयवादी सरकार असल्याचा आमच्यावर आरोप केला. आता तर नागालँडमधील भाजपाच्या सरकारलाच पाठिंबा दिला. हेच का ते बदलाचे वारे असा खोचक टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

त्यानंतर कसबा पेठचा निकाल आल्यानंतर अजित दादा तुम्ही तसे चांगले आहात पण तुम्ही काय म्हणालात कसब्याच्या निवडणूकीने मुख्यमंत्र्यांना जागा दाखविली. मग पिंपरी चिंचवड हा तर तुमचा बाले किल्ला तेथे तर पुन्हा एकदा तुमचा पराभव झाला. मग आम्ही म्हणायचे का अजित पवारांना मतदारांनी जागा दाखविली. भाजपाच्या सरकारला न मागता पाठिंबा दिल्याचे तुम्ही एकदा इथेही केलात. आताही तेथील सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता. तरीही तुम्ही तो दिलात. कसबा पेठ निकालावरून तुम्ही आमचा पराभव झाल्याचे म्हणालात पण तुम्हाला भाजपाने तीन राज्ये जिंकली ते नाही दिसले का असा सवालही केला.

तुम्हीही नेमके आलात की आम्हाला उद्देशून खोके सरकार खोके सरकार म्हणता मग आम्हीही तुम्हाला या पाठिंब्यावरून खोके सरकार असे म्हणायचे का असा खोचक सवालही केला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *