Breaking News

शेलारांचे मलिकांना प्रत्युत्तर, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्या फोटोवरून शेलार आक्रमक

मुंबईः प्रतिनिधी
नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा असल्याचे प्रत्युत्तर भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथआ अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिले.
पण त्रिपुरातील घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलींचा आणि सन २०१६-१७च्या फोटोचं संबंध काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मलिकांच्या आरोपांना एका व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत तो व्हिडिओ ट्विट केला.
माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील असा इशारा देत तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीनेही फोटोचं राजकारण बंद करावे अशी मागणी केली.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *