Breaking News

आपच्या झाडूने भाजपाचे गर्वहरण तर काँग्रेस साफ ७ ठिकाणी भाजपाला मिळाला विजय

नवी दिल्लीः प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपा नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधला. त्यासाठी निवडणूकीचा प्रचार धर्मावर आधारीत कसा होईल याची रणनीती आखण्यात आली. यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरातील नेते-कार्यकर्त्यांची फौज उभी करत आम आदमी पार्टीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या टकरीत दिल्लीकरांनी आपवर विश्वास दाखवित भाजपाचे पुरते गर्वहरण केले तर काँग्रेसला नावालाही शिल्लक ठेवले नसल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले.
देशभरात सीएए कायदा लागू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केली. त्यानंतर एनसीआर, एनपीआर कायदा लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे दिल्लीतील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यातच या कायद्याच्या विरोधात येथील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांने गोळीबार केला. तर जेएनयु विद्यापीठातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याशिवाय नुकताच शाहीन बाग येथे सुरु असलेल्या मुस्लिम महिला आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामागे हिंदू विरूध्द मुस्लिम मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत होता. परंतु दिल्लीकरांनी या प्रयत्नाला हाणून पाडत आपच्या पारड्यात माफ टाकले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भाजपा आणि आप अशी थेट लढत निकालात बघायला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करत भाजपानं ‘आप’ला आव्हान दिलं. मात्र, ‘आप’नं विकासाचा मुद्दा दिल्लीकरांच्या समोर मांडत भूमिका कायम ठेवली. या निवडणूकीत भाजपाला ३ जागांवरून ७ ठिकाणी विजय मिळविता आला सत्तेत येण्याचा त्यांचा दावा पुर्णपणे धुळीस मिळाला. आप ला मात्र मतदारांनी भरभरून मतांचे दान टाकत त्यांच्या पारड्यात ६३ जागा टाकल्या. या निवडणूकीत काँग्रेसचे अस्तित्व दिसून येईन अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र काँग्रेसचा सुफडा साफ झाल्याचे दिसून आले. तसेच या निवडणूकीच्या रणागणांत काँग्रेस कोठेच दिसली नाही.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *