Breaking News

दिल्लीकरांच्या मतदानातून भाजपाच देशद्रोही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी
दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाने आपली सर्व शक्ती खर्ची टाकली. गृहमंत्री अमित शाहंच्या ४४ सभा, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदीनाथ यांच्या १२ हून अधिक सभा, देशातील २७० खासदार, भाजपाचे नेते, भाजपा राज्यातील मंत्री यांच्यासह लाखभर कार्यकर्त्ये प्रचारासाठी मैदानात उतरले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे देशद्रोही पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन दिल्लीकरांनी स्विकारत आम आदमी पार्टीला भरभरून मतदान करत त्यांनाच देशद्रोही ठरविल्याचे मिश्किल टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी केली.
या निवडणूकीत भाजपाकडून पैसे वाटण्यात आले. जनतेमध्ये द्वेष पसरविण्यासाठी प्रशोक्षक भाषणे केली, मुख्यमंत्र्यांना देशद्रोही संबोधले. तरीही दिल्लीच्या जनतेने विकास कामांना पावती देत अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखविला. हरयाणा, झारखंड आता दिल्लीतील परिस्थिती सारखीच झाली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या राजकारणाला लोक कंटाळले असल्याचे दिसून येत आहे. निवडणूकीत पराभव व्हावा याकरिता आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर मंत्र्यावर खटले दाखल, त्यांच्यावर चौकशीचा बडगा उगारला. परंतु, भाजपाच्या या सर्व खेळांना लोकांनी नाकारले असून विभाजकारी विचारांना जनता भूलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने मतविभाजनासाठी स्थानिक पक्षाबरोबर आघाडी करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांना मदत करायला पाहिजे असे सांगत या गोष्टींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आम आदमी पक्षाबरोबर काँग्रेसची आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले. मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घालवून भाजपाचे सरकार आणण्यासाठी भाजपाचे नेते प्रयत्न करत आहेत. मात्र ते फक्त रात्री झोपेतच स्वप्ने पहात असून त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास विभागाच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन होणार
कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत ४१७ आयटीआय आहेत. या आयटीआयमध्ये क,ग,ड या वर्गात शिक्षक आणि कर्मचारी करत आहेत. त्यांच्या बदल्याच्या अनुषंगाने अनेक निवेदने करण्यात येत असून या बदल्यांमध्ये सूसुत्रतता यावी यासाठी ७ फेब्रुवारी रोजी वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टल मार्फतच ऑनलाईन बदल्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या बदल्या एकाचवेळी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *