Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जयंत पाटील यांचा फोन आला होता…त्यांना सांगितले

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहे. मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी एक्सवरुन माध्यमांना सांगितले आहे. तसेच, जर तारीख २७ ऐवजी २८ होणार असेल तर आम्ही येऊ, असेही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळवले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला आणि त्यांनी २७ फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली. आम्ही त्यांना सांगितले की, २७ तारखेला आम्ही येऊ शकत नाही. पुण्याला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. महाराष्ट्राची पूर्ण राज्य कमिटी यावेळी पुण्यात असणार आहे. तसेच, जयंत पाटील यांना विनंती केली आहे की, २८ तारखेला शक्य होत असेल तर आपण तेव्हा बैठक ठरवू.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी याविषयी पक्षातील लोकांशी चर्चा करुन सांगतो म्हटले आहे. मात्र, सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये २७ फेब्रुवारीला बैठक असल्याचे सांगितले आहे. पण, आम्ही संजय राऊत यांना सांगतोय, की पुण्यात जाहीर सभा संध्याकाळी असणार आहे. त्यामुळे २७ च्या बैठकीला आमचे जमणार नाही, पण तीच तारीख २८ होणार असेल तर आम्ही येऊ, असंही स्पष्ट केलं.

 

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *