Breaking News

पालकमंत्री, खाते वाटप रखडणार, १५ ऑगस्टला कोणता मंत्री कोठे झेंडा फडकाविणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्वांना आदेश जारी

विरोधकांच्या सततच्या टीकेला घाबरून अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात २० जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार करूनही दोन दिवस होत आले तरी कोणाला कोणते खाते द्यायचे आणि कोणाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमायचा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच दिल्लीतील भाजपा श्रेष्ठींकडूनही अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. त्यातच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कोण जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडा फडकविणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्व मंत्र्यांसाठी एक आदेश जारी करण्यात आले असून मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यात जावून झेंडा फडकाविण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशन अवघ्या ५ दिवसांवर येवून ठेपलेले असताना आणि स्वांतत्र्य दिनासारखा मोठा राष्ट्र सोहळा असताना झेंडा फडकाविण्याची जबाबदारी नेमकी कोणावर राहणार याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणता मंत्री कोठे झेंडा फडकाविणार? यादी खालीलप्रमाणे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- नागपूर

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर

चंद्रकांत पाटील-पुणे

राधाकृष्ण विखे-पाटील-अहमदनगर

गिरिष महाजन-नाशिक

दादाजी भुसे-धुळे

गुलाबराव पाटील-धुळे

रविंद्र चव्हाण-ठाणे

मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर

दिपक केसरकर-सिंधुदूर्ग

उदय सामंत-रत्नागिरी

अतुल सावे-परभणी

संदीपान भुमरे-औरंगाबाद

सुरेश खाडे-सांगली

विजयकुमार गावित-नंदूरबार

तानाजी सावंत-उस्मानाबाद

शंभूराज देसाई-सातारा

अब्दुल सत्तार-जालना

संजय राठोड-यवतमाळ

विभागीय आयुक्त-अमरावती

यानंतर कोल्हापूर, सोलापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, लातूर, वाशिम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांना १५ आँगस्टला झेंडा फडकाविणास मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी झालेले आदेश खालीलप्रमाणे…

Check Also

एचडी कुमारस्वामी यांची माहिती, जनता दलातून प्रज्वल रेवन्ना याची हकालपट्टी

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची जनता दलाचे प्रमुख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *