Breaking News

घर कामगार महिलाच्या समस्यांसाठी “श्रम सन्मान” २३ मार्च शहिद दिनी होणार आझाद मैदानावर होणार सभा

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ( जी.डी.पी.) ५०% टक्यांची भर घालणा-या असंघटित कामगारां मध्ये सर्वात मोठे प्रमाण घरकाम करणाऱ्या महीलांचे आहे, आपल्या श्रमाचे योग्य मुल्य मागण्याचा त्यांचा लढा गेली चार दशके चालू आहे. आणि आपल्या संघटीत ताकदीने त्यांनी देशभरात कोठेही नसलेला घरेलू कामगार कल्याण मंडळा सारखा स्वतंत्र कायदा महाराष्ट्र राज्यात सन २००८ साली मंजूर करून घेवून त्यांच्या सामाजिक सुरक्षा( उदा. पेंशन, विमा, किमान वेतन )आणि कामगार हक्कांच्या पुर्ती साठीचा पाया तयार करून आपली श्रमिक म्हणून नोंद घेण्यास शासनाला भाग पाडलेले आहे. तरी गेले दोन-तीन वर्षे कोविड -१९ च्या महामारीमुळे त्यांचे जगण्याचे प्रश्न अधिक तीव्र होण्या सोबतच वेतन कमी होणे, घरातील अनेकांचे रोजगार जाने व वयस्कर घरकामगारांची कामे पुर्ण बंद होणे या सारखे प्रश्न या आजच्या वाढत्या महागाईच्या काळात त्यांच्या समोर आवासुन उभे ठाकले आहेत, अनेक वर्षांच्या लढ्यातून काही कल्याणकारी योजना पदरात पडल्या असल्यातरी आजच्या परिस्थितीत उपजीविकेची हमी म्हणून त्यांनी गेले दोन वर्षे या बिकट काळात मंडळा मार्फत दरमहा ५०००/- रु चे अनुदान घरकाम करणाऱ्या महिलांना मिळावे म्हणून घर कामगार महिलांनी सरकार कडे पाठपुरावा ठेवला आहे, असे असतांना केवळ एक वेळेस रु १५००/ चे अनुदान राज्य सरकारने नोंदीत कामगारांना मंडळा मार्फत जाहीर करुन नोंदवल्या गेलेल्या ५ लाखांहून अधिक असलेल्या राज्य भरातील कामगारांपैकी केवळ ३०% कामगारांपर्यंत हा लाभ दिलेला असून अजून लाखो कामगार या लाभापासून वंचित राहीलेले आहेत. ह्या परिस्थितीत उपजीविका आणि निवारा वाचवणे हे प्रमुख मुद्दे घेवून , तसेच उच्य न्यायालयात याचिका दाखल करुन महाराष्ट्र सरकारला घरेलु कामगारांच्या प्रश्नांची नोंद घेण्यास समन्वय समितीने भाग पाडले आहे, याच पार्श्वभूमीवर अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना आपल्या मागण्यां मांडण्या साठी घरकामगार महीलांची श्रम सन्मान सभा राष्ट्रीय घरकामगार चळवळी- महाराष्ट्र ने आयोजित केली आहे, या सभेत खालील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

१) मा.उदय भट ( अध्यक्ष – सर्व श्रमिक संघटना – महाराष्ट्र)

२)मा.आमदार, नाना पटोले ( प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी )

३)मा.जितेंद्र आव्हाड, कॅबिनेट मंत्री, गृह विभाग

४)मा.आमदार, संजय केळकर, ठाणे (विधानपरिषद )

५)मा.आमदार, महेंन्द्र थोरवे ( कर्जत विधानसभा सभा मतदार संघ )

ठोस मागण्या खालील प्रमाणे आहेत:-

  1. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्यातील त्रुटी दूर करा व मंडळातील भोंगळ कारभार दूर करून मंडळ सक्षम करा त्रिपक्षीय मंडळ स्थापना करा !
  2. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाला भरीव आर्थिक तरतूद करा!
  3. किमान वेतन, रजा, वैद्यकीय सुविधा, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन इत्यादी सामाजिक हक्क त्वरित लागू करा!
  4. कोविड 19 सहाय्यता निधी पासून वंचित राहिलेल्या सर्व नोंदणीकृत घरेलू कामगारांना त्याचा लाभ त्वरीत द्या !
  5. कोरोना काळ संपुष्टात येई पर्यंत प्रत्येक घरेलू कामगारांना 5000/- रुपये निधी देण्यात यावा !
  6. जेष्ठ घरेलू कामगार महिलांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करा!

7.कामाच्या ठिकाणी महीलांच्या सुरक्षेची हमी निर्माण करावी.

२३ मार्च, शहीद दिनी शासनाच्या नाकार्तेपणाचा जाब विचारण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षेच्या हमी साठी घरकामगार महिलांची आझाद मैदान, मुंबई येथे ” घरकामगार श्रम सन्मान सभा ” २३ मार्च २०२२, वेळ – दु. ३ ते ५ वाजता होणार.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *