Breaking News

भावी १२ आमदारांच्या नावावर मंत्रिमंडळाचे एकमत…पण नावे लखोट्यात बंद! नावांबाबत कमालीची गुप्तता

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाच्या प्रस्तावाला अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी ४ नावांबाबत तिन्ही पक्षांत अखेर एकमत होऊन सदर १२ नावांची यादी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
या नावांची चर्चा
शिवसेनेच्या यादीतले महत्वाचे नाव असलेल्या आदेश बांदेकरांचे नाव अत्यंत नाट्यमय रित्या शेवटच्या क्षणी वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, अदिती नलावडे, एकनाथ खडसे, आनंद शिंदे, नसीम खान, सचिन सावंत यांची नावे नक्की झाल्याचे कळते. उर्वरित ५ नावांमध्ये अजूनही शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असल्याचे कळते.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ?…

नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *