Breaking News

पुणे, नाशिक, कोकणला पुढील ४८ तासाचा इशारा; वाचा जिल्हानिहाय पाऊस स्थिती भारतीय हवामान खात्याकडून इशारा जारी

सबंध जून महिना नाराज असलेल्या पावसाने जुलै महिना उजाडताच आपली हजेरी लावण्यास सुरुवात केलेली असून त्यात अद्याप खंड पडू दिला नाही. मागील आठवड्यापासून सक्रिय मान्सूनने कोकण, पुणे, मुंबईला पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाच विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने हजेरी लावत जून महिन्यातील तुटीचा कालावधी मान्सूनने भरून काढला असेल असे म्हणावे लागेल.

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पाऊसाच्या इशाऱ्यानुसार पुढील ४८ तासांसाठी पावसासंदर्भातील इशारा देण्यात आला आहे. त्यात घाट परिसरात रेड अलर्ट (अतिवृष्टी), तर शहरासाठी ऑरेंज अलर्ट (मुसळधार) असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाला आहे. खडकवासला धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाची सुरू असलेली संततधार अशीच दोन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेतील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत घाट परिसरात अतिवृष्टी, तर शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नागरिकांनी घाट परिसरात जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *