Breaking News

हवामान खात्याचा इशाराः पारा ४० सी पार, उष्णतेची लाट येण्याची शक्यता

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाची काहीली वाढायलला सुरुवात झाली आहे. आधीच राज्यात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावू लागले आहे. त्यातच देशातील निवडणूक आचारसंहितेची घोषणा केल्यापासून तर महाराष्ट्रासह देशातील राजकिय वातावरण चांगलेच वाढायला लागलेले असतानाच वातावरणातील उष्मा चांगलाच वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीसच राज्यातील उन्हाच्या पाऱ्याने ४० पार गाठण्यास सुरुवात झाल्याने आणखी दोन महिने अर्थात एप्रिल आणि मे महिना कसा निघणार असा सवाल आता नागरिकांनाकडून उपस्थित होत आहे.

मागील तीन-चार दिवसापासून राज्यातील मोठ्या महानगरातील पारा मार्च महिन्यातच ४० पार जात असल्याचे आणि जाणार असल्याचे भाकित हवामान खात्याच्या विभागीय कार्यालयाने त्यांच्या एक्स या सोशल मायक्रो बॉग्लिंग साईटवरून इशारा सातत्याने देत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणातील उष्म्यापासून आणि घराबाहेर पडल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देवू नका पाणी सातत्याने प्या अशी सूचना राज्यातील जनतेला देत आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान खात्याने दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दिवसाबरोबरच रात्रीही उष्ण वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच विदर्भात एकाकी उष्माघाताची लाट येण्याची शक्यताही वर्तविली आहे. याशिवाय पुढील काही तासात कोकणसह काही जिल्ह्यात ३०-४० प्रतितास वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडटासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज शुक्रवार गुड फ्रायडे असल्याने अनेकांना सुट्टी होती. तरी दिवसभर ३० ते ४० अंश सेल्सियस दरम्यान वातावरणात उष्मा राहिल्याने अनेक मुंबईकरांना घामाच्या धारातच प्रवास करण्याची पाळी आली. तर अनेकांनी सुट्टी आणि वाकावरणातील उष्मामुळे घरातच बसून राहणे पसंत केले.

 

Check Also

आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *