Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात AI वर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यात बदलते तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शी संबंधित धोक्यांविषयी चर्चा करताना या नव्या तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण दिले गेले नाही तर लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर करू शकतात, अशी भीती पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत जर लोकांनी एआयला जादूचे साधन म्हणून वापरले तर ते “गंभीर अन्यायकारक” ठरेल अशी शक्यताही व्यक्त केली.

यावेळी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी यांनी चर्चा करताना भाषा ट्रान्सलेटर तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे बिल गेट्स हे इंग्रजीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत होते तर त्यास उत्तरे नरेंद्र मोदी हे हिंदी भाषेतून देत होते. या फ्रीव्हीलिंग संभाषणात, पंतप्रधान मोदी म्हणाले की डीपफेकच्या समस्येचा सामना करण्यासाठी एआय-उत्पन्न सामग्रीमध्ये वॉटरमार्क असणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

बिल गेट्स यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतकी चांगली गोष्ट (एआय) योग्य प्रशिक्षणाशिवाय एखाद्याला दिली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. मी सुचवतो की आपण एआय-निर्मित सामग्रीवर स्पष्ट वॉटरमार्कसह सुरुवात केली पाहिजे जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही. भारतासारख्या लोकशाही देशात, कोणीही डीपफेक वापरू शकतो, अशी शक्यताही यावेळी व्यक्त केली. तसेच डीपफेक सामग्री AI-उत्त्पन्न आहे हे मान्य करणे महत्वाचे आहे. आपण काही करावे आणि करू नये याबद्दल विचार करणे आवश्यक आहे, असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले. .

PM मोदींची टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा अनेक डीपफेक व्हिडिओ आणि बॉलिवूड कलाकार, खेळाडू आणि इतर नामांकित लोकांचे फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे AI च्या गैरवापराबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी मानवी उत्पादकता सुधारण्यासाठी ChatGPT सारख्या AI साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले. परंतु “आळशीपणे” तंत्रज्ञानाचा वापर करणारे चुकीचा मार्ग निवडत असल्याचा इशारा दिला.

जर आपण AI चा जादूचे साधन म्हणून वापर केला तर कदाचित तो गंभीर अन्यायाला कारणीभूत ठरेल. जर AI वर आळशीपणावर अवलंबून असेल तर तो चुकीचा मार्ग आहे. माझी चॅटजीपीटीशी स्पर्धा असली पाहिजे आणि एआयच्या पुढे जाण्याचा आणि त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

बिल गेट्स यांनी AI ची उपयुक्तता मान्य केली आणि सांगितले की ही एक “मोठी संधी” असली तरी ती “काही आव्हाने” देखील घेऊन येते ज्यांना संबोधित करणे आवश्यक आहे.

बिल गेट्स म्हणाले की, हे AI मधील सुरुवातीचे दिवस आहेत. ते अशा गोष्टी करेल ज्या तुम्हाला कठीण वाटतात आणि नंतर ते असे काही करण्यात अपयशी ठरेल, जे तुम्हाला सोपे वाटते. एआय ही एक मोठी संधी आहे असे दिसते, परंतु काही आव्हाने आहेत.

गेल्या वर्षी वाराणसी येथील काशी तामिळ संगम कार्यक्रमादरम्यान त्यांचे हिंदी भाषण तामीळ भाषेत कसे अनुवादित केले गेले हे नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांना सांगितले आणि चौथ्या औद्योगिक क्रांती किंवा ‘इंडस्ट्री 4.0’ दरम्यान भारताला “बरेच काही मिळेल” असे अधोरेखित केले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *