Breaking News

राहुल गांधी यांची हमी, …लोकशाहीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

लोकसभा निवडणूकीला सुरुवात झाल्यानंतर आयकर विभागाने नव्याने काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवित १८०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला. मागील वर्षी आयकर परतावा दाखल आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे. यावरून
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी चक्क हमी देत म्हणाले की, भाजपाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा ज्यांनी लोकशाहीचे उल्लंघन केले त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

पुढे आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, अशी अनुकरणीय कारवाई केली जाईल की पुन्हा कोणीही हे सर्व करण्याची हिंमत करणार नाही. ही माझी हमी आहे, असे भाजपाला निक्षून सांगितले.

विशेष म्हणजे, भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी ‘मोदी की हमी’ मोहीम राबवत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक आश्वासने पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकत आहे.

माजी काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा मागील व्हिडिओ देखील टॅग केला आणि त्यांच्या पोस्टसह “#BJPTaxTerrorism” हा हॅशटॅग वापरला. शुक्रवारी, काँग्रेसने सांगितले की मागील वर्षांच्या कर रिटर्नमधील विसंगतींसाठी आयकर विभागाकडून १,८०० कोटी रुपये जमा करण्याची नवीन नोटीस मिळाली आहे. नोटीसला “निंदनीय” म्हणत, काँग्रेसने भाजपावर “कर दहशतवाद” मध्ये गुंतल्याचा आरोप केला.

काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आम्ही खचून जाणार नाही, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसने आयकर आदेशाविरोधात आठवड्याच्या शेवटी देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसने आयकर चुकवल्याचा आरोप करत पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली होती. पक्षाला १३० कोटी रुपये कथित थकीत कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर सूचनेविरुद्ध पक्षाचे अपील फेटाळल्यानंतर आयकर विभागाने त्यांच्या बँक खात्यांमधून ५१ कोटी रुपये वसूल केले, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *