Breaking News

Tag Archives: marathwada

सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस

एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे ४२.४ अंश …

Read More »

महाराष्ट्रातील पूरव्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या पैशातून पूर्ण होणार

मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे दिला मुख्यमंत्र्यांना इशारा, …अशी पळवाट सरकारने

वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व …

Read More »

अंबादास दानवे यांचा सवाल,… हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो विधान परिषद सभागृहात सवाल

मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातून मराठवाडयाला हक्काचे समन्यायी पाणी वाटप करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही या विभागाला नेहमीच यासाठी संघर्ष का करावा लागतो, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला. अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले, गोदावरी पाटबंधारे विकास …

Read More »

मराठवाडा – विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक-मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वर्ल्ड बँकेच्या …

Read More »

नाना पटोले यांची मागणी,… तातडीने दुष्काळ जाहीर करा शिक्षक, पोलीस दलासह विविध पदे रिक्त असताना सरकार भरती का करत नाही - अशोक चव्हाण

राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचे सरकारने पालन करावे तसेच मराठवाड्यातील परिस्थिती पाहता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात …

Read More »

मराठवाड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले महत्वाचे निर्णय छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या बैठकीत घोषणांचा पाऊस

राज्यातील मराठवाडा मुक्ती संग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजी नगर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. आज झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालील प्रमाणे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त …

Read More »

अंगणवाड्यापाठोपाठ आता राज्यातील शाळा दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील लहानमुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्या खाजगी स्वंयसेवी संस्थाना दत्तक स्वरूपात देण्यात आल्यानंतर आता राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता येणार नाही. कॉर्पोरेट ऑफिसेसना …

Read More »

मुख्यंमंत्री शिंदे यांची घोषणा, मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटींच्या या विविध विकास योजना मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प

मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी …

Read More »