Breaking News

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला २१ भूकंपाचे धक्के आता त्सुनामीचा धोका

जगभरात ३१ डिसेंबर २०२३ रोजी अखेरचा निरोप देत हर्षोल्लास आणि आनंदात नववर्षाचे स्वागत केले. त्यानंतर १ जानेवारी २०१४ सर्वोदय झाल्यानंतर जगभरातील तमाम नागरिक नव्या वर्षाचा पहिला दिवस आनंदात आणि नव्या उत्साहात सुरु करण्याचे ठरवून आपापल्या कामात गुंतला असतानाच दुपारच्या सुमारास ७.१ आणि ४.५ रिश्टर इतक्या तीव्रतेचे २१ भूंकपांचे धक्के जपानला बसले. त्यामुळे जपानमधील घरांचे, रस्ते-पूल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच जपान सरकारने आणखीही भूकंपाचे धक्के बसणार असल्याचा इशारा देत त्सुनामीचा इशारा देत जपानी नागरिकांना मोकळ्या मैदानात थांबण्याची सूचना केली आहे.

जपानच्या मध्यवर्ती भागात दुपारी ४ वा. १० मिनिटे झालेले असताना ४.० रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली. तब्बल ९० मिनिटे एका पाठोपाठ भूकंपाचे धक्के सातत्याने बसत होते. नववर्षाचा पहिलाच दिवस म्हणून जपानी नागरिकांनी मोठ्या उत्साहात दैनंदिन चर्येला सुरुवात केली. परंतु दुपारी भूकंपाच्या धक्क्याने या नागरिकांचा उस्ताहावर काही काळ विरजण पडल्याचे दिसून आले. अमेरिकेच्या जिओलॉजिकल संस्थेने जपानला ४.० रिश्टर स्केल किंवा जास्त क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसले. तसेच जपानच्या इशिकावा प्रदेशात ७.४ चे भूकंपांचे धक्के बसल्याची माहिती दिली. तसेच जवळपास ९० मिनिटांमध्ये २१ भूकंपनाचे धक्के बसले असून आणखीही भूकंपाचे धक्के बसण्याचा इशारा दिला. तसेच त्सुनामी येण्याचा इशाराही दिला.

अमेरिकन संस्थेने दिलेल्या इशाऱ्याला जपानच्या हवामान विभागाने दुजोरा दिला असून जपानच्या नागरिकांना घरात किंवा इमारतीच्या आडोशाला बचावासाठी उभे राहण्याऐवजी मोकळ्या मैदानावरच थांबा अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत. तसेच भूकंपानंतर जपानमधील वाहतूक व्यवस्था जवळपास ठप्पच झाली असून अनेक रस्त्यांना त़डे जाऊन मोठ्या लांब अंतराच्या भेगा पडल्या आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.

जपानमधील टोयामा, इशिकावा, निगाटा आदी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू आढळून आला असून या भागातील ३३ हजार ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्याचबरोबर या भागाला करण्यात येणारा विद्युत पुरवठा आणि स्थानिक सोयी-सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत.

मात्र काही कालावधीनंतर जपानच्या सरकारी यंत्रणेने त्सुनामीचा इशारा मागे घेत त्सुनामी येण्याचा कालावधी निघून गेले असल्याची माहिती जारी केली. मात्र ३ मीटर अर्थात १० फुट उंचीच्या लाटा समुद्रात निर्माण होऊ शकतात असा इशारा दिला.

दरम्यान, भारतासह अनेक देशांनी नागरिकांच्या मदतीसाठी मदत केंद्रे आणि हेल्पलाईन नंबर्स सुरु केले असून भूकंपप्रणव क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी संबधित देशांची यंत्रणा सज्ज असल्याचे प्रसिध्द पत्रक जारी केले आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मान्सूनः वेट अॅण्ड वॉच फक्त काही… हवामान खात्याचा अंदाज

येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया…..https://t.co/jw7yrf8Es5 pic.twitter.com/tW7xjyii2J …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *