हवामान

हवामान खात्याचा इशारा, चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस पडणार २६ ते २८ ऑक्टोंबर दरम्यान येणार

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले एक दबाव तीव्र चक्री वादळात तीव्र होऊन २८ ऑक्टोबर रोजी मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यानच्या काकीनाडाभोवती आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार. चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे की, हवामान प्रणाली पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे आणि २६ ऑक्टोबरपर्यंत खोल दाबाच्या पट्ट्यात, २७ …

Read More »

हवामान खात्याकडून १७ ते २१ ऑक्टोंबर पर्यंत जारी केली सूचना मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना

भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव …

Read More »

आयएमडीचा इशारा, ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांची माहिती

भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी दिली. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पूर्व-ईशान्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर देशाच्या इतर भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची …

Read More »

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि  पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक पथके तैनात करण्यात आली …

Read More »

हवामान विभागाचा ठाणे जिल्ह्याला दिला रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट २८ सप्टेंबरला रेड, २९ ला ऑरेंज तर ३० सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास …

Read More »

रायगड, पुणे घाट परिसरात रेड अलर्ट; ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आठ जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज

रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या …

Read More »

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एकूण ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित २ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर

१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास …

Read More »

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत

२४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० …

Read More »

राज्याला पाऊसाने झोडपले! २१३ लोक पूराच्या पाण्यात अडकले एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू

राज्यात मागील तीन दिवसांपासून असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याला झोडपून काढले. परिणामी पूर स्थितीत निर्माण झाल्याने पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू केल्याची माहिती, मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली. तसेच पुढील दोन दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याचे ही सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षातील राज्यातील …

Read More »

आयएमडीचा इशारा, सप्टेंबर महिन्यात देशात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता मासिक सरासरीच्या १०९ टक्के जास्त पाऊस

सप्टेंबरमध्ये भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशाच्या अनेक भागात आधीच अनेक मुसळधार पावसामुळे झालेल्या आपत्तींचा सामना करणाऱ्या हंगामाचा शेवट होईल, असे भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी (IMD) रविवारी (३१ ऑगस्ट २०२५) सांगितले. सप्टेंबर २०२५ मध्ये मासिक सरासरी पाऊस १६७.९ मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०९% पेक्षा जास्त होईल …

Read More »