Breaking News

सरदेसाईंचा पलटवार, मी उच्च शिक्षित तर राणेंची पार्श्वभूमी फडणवीसांनी सांगितलीय राणेंच्या आरोपावर सरदेसाईंचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी

मी मुंबईत दहावी, १२ वीच्या परिक्षेत डिस्टींक्शन मिळविले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इंजिनियअरींगच्या अभ्यासक्रमात आणि ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या परदेशातील कॉलेजमध्येही मी डिस्टींक्शनमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मला भाजपाचे आमदार नितेश राणे आरोप केल्याप्रमाणे मला तशी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नसल्याचे सांगत केवळ माझे राजकिय कारकिर्द उध्दवस्त करण्यासाठीच आरोप केले असून ते तथ्यहीन आहेत. त्याबद्दल त्यांना आपण अवमानकारक नोटीस बजाविणार असल्याचा इशारा शिवसेनेचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी दिला.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आरोप केल्यानंतर त्यास प्रतित्तुर देण्यासाठी शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माझी पार्श्वभूमीवर पाह्यली तर अशी शिक्षित अशी असून राणे यांची पार्श्वभूमी पाह्यली तर ती सर्वांनाच माहित असून त्याची सर्व माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडली असून ती तर रेकॉर्डवरच असल्याचा पलटवार त्यांनी नितेश राणेंवर यावेळी केला. यावेळी सरदेसाई यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब हे ही उपस्थित होते.

राणे कुटुंबियाचे आतापर्यंतचे आरोप पाहिले तर बेछुट असल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे लक्ष देण्याची गरज नाही. तसेच तथ्यहीन असल्याचे स्पष्ट करत याप्रकरणी त्यांना क्रिमिनल अवमानकारक नोटीस पाठविणार असून त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागले. अन्यथा त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? असा सवाल मंत्री अनिल परब यांना विचारले असता ते म्हणाले की, अशी चर्चा सुरु असली तरी मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल होणार नाही.

सचिन वाझे अटकेप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, याप्रश्नी तपास सुरु आहे. तपासात काय सत्य असेल ते बाहेर येईलच. त्यामुळे याप्रकरणावर काहीही बोलणे उचित होणार नसल्याचे स्पष्ट केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *