Breaking News

अखेर सुनिल पाटील आला समोर… वाचा काय केले नवे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पण २०१६ नंतर अॅक्टीव्ह नाही

मुंबई: प्रतिनिधी

आर्यन खान प्रकरणी नव्याने नाव पुढे आलेला सुनिल पाटील हा अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत या प्रकरणातील नवे खुलासे आणत यासंपूर्ण प्रकरणाची टीप मी दिली नाही ना ती माझ्याकडे होती. ती टीप मनिष भानुशाली त्याचा मित्र धवल भानुशाली आणि मध्य प्रदेशातील नीरज यादव यांच्याकडे होती असा गौप्यस्फोट करत यातील मुख्य सुत्रधार हे के.पी.गोसावी, मनिष भानुशाली, सॅन्युअल डिसुझा हेच असून त्यांच्यातच व्यवहार झाला असून याबद्दल मला काहीही माहिती नसल्याचा खुलासा केला.

सुनिल पाटील यांने याप्रकरणी स्वत:हून मिडीयासमोर केल्याने आता यासंदर्भातील गुढ आणखी वाढले आहे.

आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही. त्याचबरोबर ‘गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये काहीच नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते. शराब, कबाब असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोजला सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोहित कंबोज यांनी माझे संबध ऋषिकेश देशमुख यांच्याशी असल्याचे सांगितले. पण मी ऋषी देशमुखला ओळखत नाही. त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही तसेच मी त्यांना कधी पाहिलंही नाही. त्यांनी वळसे पाटील यांच नाव घेतलं. बनाव रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नसल्याचा खुलासाही त्याने यावेळी केला.

मी जर बदल्यांचं रॅकेट चालवत आहे तर माझ्याकडे किमान १०० कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास कर आणि नंतर रॅकेटची वार्ता कर असे आव्हानही सुनील पाटील यांनी मोहित कंबोज यांना दिले.

पाच-सहा दिवसांपूर्वी मनिष, धवल भानुशाली आणि दिल्लीतील एकजण यांनी मला दिल्लीत बोलावून घेतलं होते. दिल्लीत गेल्यावर या दोघांनीही मला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप करत तु आमच्यासाठी एनसीपीचे ट्रम्प कार्ड आहेस. आपण वरिष्ठ नेत्यांना भेटू तुला आम्ही सेफ करतो असे सांगत होते. त्यानंतर त्यांनी मला अहमदाबादला परत आणले. तेथून मी कसा तरी तेथून निघालो आणि रात्रभर प्रवास करून मी मुंबईत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

मी अहमदाबादमध्ये असताना नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. अहमदाबादेत मी थांबलो होतो. तेथील सीसीटीव्ही फुटेज काढून पाहू शकता अशी पुस्तीही त्याने यावेळी जोडली.

या प्रकरणात मला फसवलं गेलं. मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. मी सह्याद्री अतिथीगृहात गेलो की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज काढून तपासा, असे आव्हानच त्यांनी दिलं.

मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर १० तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते, शराब, कबाब असं तिथे घडत होतं, असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोज यांना सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच असा दावाही त्याने केला.

सॅनियल डिसुझा हा माझ्याकडे माझ्या काही कॉमन मित्रांच्या माध्यमातून माझ्याकडे येत जात होता. त्याने काही दिवसानंतर मला एनसीबीने पाठविलेली नोटीस दाखविली आणि काही ओळख आहे का? असे विचारत मला १० ते १५ लाख रूपयांची मदत करण्यासंदर्भात विचारले. त्यावर मी त्याला माझी कोणतीही ओळख नाही आणि माझी अडचण सुरु असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने मला फोन करून सांगितले की मी एनसीबीला जबाब दिला आणि २५ लाख रूपये दिले. आता त्या केसमधून बाहेर आल्याचेही त्यानेच मला सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले.

ज्या दिवशी रेड झाली. त्या दिवशी मी अहमदाबाद मध्ये होतो. त्यावेळी मला सॅनियल आणि विजय घुले यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की डील होत आहे. पैसे द्यायचेयत त्यावेळी मी मी प्रभाकर साईल आणि के.पी.गोसावी यांचा नंबर दिला. त्यानंतर माझ्या विश्वासावर पैसे दिले. दुसऱ्या दिवशी मला पुन्हा फोन आला की काम होत नाही आहे पैसे परत द्या म्हणून त्यावेळी मी के.पी.गोसावी याला शिव्या घातल्या आणि पैसे परत द्यायला लावल्याचेही त्यांनी सांगितले.

परंतु या प्रकरणातील मास्टरमांईड मी नसून यात भलतेच मास्टरमाईंड आहेत. मला तर यातील कोणत्याच गोष्टींची माहिती नव्हती. माझ्याकडे याप्रकरणाची टीपही नव्हती. त्यामुळे या संगळ्या गोष्टींमध्ये सॅनियल डिसुझा, मनिष भानुशाली, धवल भानुशाली आणि नीरज यादव हेच मुख्य सुत्रधार असल्याचा दावाही त्याने केला.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *