Breaking News

एनसीबीच्या एसआयटी पथकाने सुरु केली चौकशी…आर्यनसह सर्वांना समन्स आर्यन खान मात्र आजारी असल्याने चौकशीला आला नाही

मुंबई: प्रतिनिधी

आर्यन खान प्रकरणावरून जवळपास एक महिन्यापासून रोज नवनवे खुलासे येत असल्याने आर्यन खान प्रकरणासह सहा हायप्रोफाईल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एनसीबीने स्थापन केलेली एसआयटी टीम सकाळी मुंबईत पोहोचली. तसेच या एसआयटी टीमने आज आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांना चौकशीसा समन्स पाठवित बोलावले. त्यानुसार अरबाज मर्चंट आणि अचित कुमार हे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाले होते अशी माहिती पुढे आली आहे.

अरबाज मर्चंटला आज सकाळी समन्स बजावण्यात आले होते. त्याला सकाळी ११ वाजता एनसीबीच्या एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते आणि तो दुपारी लवकर एनसीबी कार्यालयात पोहोचला. अरबाज अजूनही एनसीबी कार्यालयातच आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.जामीन देतांना ज्या अटी ठेवण्यात आल्या होत्या, त्याचाच भाग म्हणून आज हे दोघे विशेष पथकासमोर हजर राहिले.

आर्यन खान यालाही एसआयटी टीमने समन्स बजावले होते. मात्र तो आजारी असल्याने तो चौकशीसाठी हजर होवू शकला नसल्याचे समजते.

दरम्यान, अधिकार्‍यांकडून जेव्हा जेव्हा आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्यांना हजर राहणे अनिवार्य राहील, अशी अट जामीन देताना ठेवण्यात आली होती. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझवर अचानक छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर जवळपास तीन आठवडे कोठडीत राहिल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी आर्यनची जामिनावर सुटका करण्यात आली.

याशिवाय आर्यन खानला यामध्ये अडकविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्नपसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून हा सगळा बनाव रचल्याचे सांगत फक्त खंडणी वसुलीसाठी हा बनाव करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर या प्रकरणातील एक पंच प्रभाकर सैल याने या सगळ्या रॅकेटवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर या प्रकरणाशी संबधित अनेकजण पुढे येत हे सगळे खंडणीसाठीच करण्यात येत असल्याचे सांगत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनसीबीच्या दिल्ली हेडक्वार्टरकडून यासाठी खास एसआयटी टीमची स्थापना करण्यात आली.

याशिवाय एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे बोगस जातप्रमाण पत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. यासंदर्भात आता नव्याने चौकशी समिती होणार असून त्या मार्फत जात प्रमाणपत्राची चौकशी सुरु होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी टीमची स्थापना करण्यात आली आहे. या टीमकडूनही आता तपासास सुरुवात करण्यात येणार आहे.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *