Breaking News

Tag Archives: shivsena

भरत गोगावले यांचे मोठे विधान, …न्यायालयाचा निकाल येणार नाही सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांबाबत केले मोठे वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल अद्यापही न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया …

Read More »

उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच मुंबई महापालिकेने अद्याप परवनागी न दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाने मुंबई महापालिककडे रितसर अर्ज केला. मात्र त्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी शिवाजी पार्कवर आमचाच दसरा मेळावा होणार असल्याचे जाहिर करत उध्दव ठाकरे यांनी हिंदूत्ववादी विचार सोडले असल्याने तो अधिकार आमचाच असल्याचे …

Read More »

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले, दसरा मेळाव्याचा अधिकार आमचा एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांना घेवून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला हक्क सांगत निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य बाणा वरही आपला हक्क सांगितला. आता एकनाथ शिंदे गटाने थेट शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आपला हक्क …

Read More »

ठाकरे-पवार यांचा सरकारी तर फडणवीसांचा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर भर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाजगी कर्मचारी, तर एकनाथ शिंदेकडे खाजगी व्यक्तींचा भरणा कमी

साधारणत: अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सांसदीय राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विराजमान झाले. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील अडीच वर्षापैकी शेवटच्या दिड वर्षात फक्त एका बिगर सरकारी व्यक्तीची खाजगी सचिव म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यासही प्रशासनाकडून मंजूरी मिळाली नाही. तरीही त्यांनी शेवटपर्यत सरकारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेतील …

Read More »

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे नवनीत राणांना म्हणाल्या, …बाई माझ्या तोंडात मार, म्हणत तीन महिन्यापासून उध्दव ठाकरेंनी कामाला लावले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडत म्हणाल्या होत्या की, उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते अशी खोचक टीका केली होती. उद्धव ठाकरे राजकारणात यशस्वी होऊ शकत …

Read More »

भाजपाचा सवाल, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

एकाबाजूला शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकटे पडत असल्याचे दिसत असतानाच आज संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेशी युती करत असल्याचे उध्दव ठाकरे यांची …

Read More »

संभाजी ब्रिगेडबरोबर युती करत उध्दव ठाकरे म्हणाले, बरं झालं ते दूर गेले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणं बरं असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत बरे झाले ते आमच्यापासून दूर गेले असा उपरोधिक टोला लगावत प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री कोणीही असलं तरी त्यांची …

Read More »

आता कॅगकडूनही महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक कोरोनाकाळात केलेल्या कामाचे आणि आर्थिक शिस्तीचे 'कॅग' अहवालात नोंद

कोरोना काळात सर्व कामकाज ठप्प असताना आणि राज्याच्या तिजोरीत एक छदाम पैशाचे इन्कम नसताना तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक दस्तुरखुद्द कॅगने केले. राज्यात सत्तांतर होवून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने मोठा सेटबॅक मानण्यात येत आहे. …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले; असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणे कधीही चांगले… पोलिसांना १५ लाखात घर, ७५ हजार जागांसाठी भरती

विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. तसेच फार मुख्यमंत्री राहणार नसल्याचे भाकितही विरोधकांकडून करण्यात आले. या टीकेचा धागा पकडत मुख्यमंत्री …

Read More »

शिंदे गटाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, त्या आमदारांची मला कीव येते… गद्दार सरकारमध्ये मंत्रीपदासाठी काय काय करावं लागतं

पावसाळी अधिवेशन संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना शिंदे समर्थक गट आक्रमक झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. काल महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत धक्काबुक्की केल्याचे प्रकरण शिंदे गटाकडून घडवून आणण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत टीका …

Read More »