Breaking News

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे नवनीत राणांना म्हणाल्या, …बाई माझ्या तोंडात मार, म्हणत तीन महिन्यापासून उध्दव ठाकरेंनी कामाला लावले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडत म्हणाल्या होत्या की, उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते अशी खोचक टीका केली होती. उद्धव ठाकरे राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. नवनीत राणा यांच्या या टीकेला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत याचं दार, त्यांचं दार, बाई माझ्या तोंडात मार या म्हणीचा उपयोग करत पलटवार केला.

उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही” अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती. त्यावर पलटवार करताना अंधारे यांनी भाजपा सरकारवरही निशाणा साधला आहे. १०५ आमदार, ४० बंडखोर, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोगासह तपास यंत्रणांना ज्यांनी तीन महिन्यांपासून कामाला लावले आहे, ते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

आमच्याकडे भटकंती करणाऱ्या लोकांसाठी एक म्हण आहे याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार असे म्हणत हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी कोरोना महामारीत लोकांचे जीव वाचवित पुण्याचं काम केले. त्यांच्याकडे गुवाहाटी, हाटील…झाडी…करत फिरायला त्यांच्याकडे ‘टुरिंग टॉकिज’ नव्हतं, असा खोचक टोलाही त्यांनी नवनीत राणा यांना लगावला.

ज्यावेळी राणा बाई म्हणतात की उध्दव ठाकरे यांच्यात दम नाही. त्यावेळी माझ्या मनात त्यांच्याबद्दल अपार करूणा वाटते की, एक तर त्यांना मराठी भाषा कळत नाही. मराठी भाषेचे अर्थ कळत नाहीत. तरीही त्यांना सांगावेसे वाटतं. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, तिन्ही राज्यांचे गृह विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्यांना तीन महिने कामाला लावले त्यांचे नाव आहे उध्दव ठाकरे असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *