Breaking News

Tag Archives: shivsena

आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, “चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका…” शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांचं जळगावात वक्तव्य

“काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते, अश्या चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय.” असं म्हणत शिव संवाद यात्रेसाठी जळगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे बॅनर फडणाऱ्या नतदृष्टांवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलाय. राज्यात सुरू असलेलं घाणेरडं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे का …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा पलटवार, फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे याचा स्ष्ट अर्थ मोदी पर्व संपत आल्याची नांदी

भाजपाच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री घरात बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा युतीचा महापौर आपल्याला बसवायचा असा निर्धार व्यक्त केला. तसेच …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला, आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही… सर्व सण जोरात होणार असल्याचे केले जाहीर

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत या बंडास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र बंडखोर एकनाथ शिंदे हे जसजसे उध्दव ठाकरे यांना इशारा वजा विनंती करत गेले तसतसे उध्दव ठाकरे हे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सेना नेते आदित्य …

Read More »

फुटीर आमदारांच्या मतदारसंघात आता शिवसेनेकडून बांधणी; सुरुवात सोलापूरातून शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातून सुरुवात

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांसह १० समर्थक अपक्षांनाही सोबत नेले. त्यामुळे  आता शिवसेनेत होणारी पडझड थांबविण्यासाठी शिवसेनेकडून बांधणीचा प्लॅन आखला असून बंडखोर आमदारांना धडा शिकविण्यासाठी बंडखोरांच्या मतदारसंघात उध्दव ठाकरे यांना मानणाऱ्या समर्थकांची सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या …

Read More »

निमित्त दही हंडीचे, शिंदे गट- भाजपाकडून समिकरण मात्र महापालिका निवडणूकीचे गोविंदा पथकांना आकृष्ट करण्याकडे कल

राज्याच्या राजकारणात विशेषत: २०१४ साली सत्तेत आल्यापासून आणि विरोधात बसून पुन्हा सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाकडून प्रत्येक गोष्ट ही निवडणूक प्रचार आणि मतदार वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट पध्दतीने करायची असा खाक्याच जणू भाजपाने स्विकारल्याचे दिसून येत आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदें यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचा पलटवार, थर लावले की थरकाप ५० थराची हंडी लावली वक्तव्याचा घेतला समाचार

आज मुंबईसह राज्यात दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र या दही हंडीतील थर लावण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही हंडी फोडलीय. ती हंडी मोठी कठीण होती. पण ५० थर लावून ती हंडी फोडल्याचे वक्तव्य करत आपल्या बंडखोरीचे मोठेपणा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा धागा …

Read More »

शेलार यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला, मला त्या बालिशपणात जायचं नाही दही हंडीवरून शेलार यांना आदित्य ठाकरे यांनी लगावला टोला

राज्यात शिवसेनेच्या बंडखोरांना सोबत घेत भाजपाने सत्ता स्थापन केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बसविले. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका काढून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर यंदा भाजपाकडून दही हंडी …

Read More »

पावसाळी अधिवेशनः ५० खोके एकदम ओके…., आले रे आले गद्दार आले…. गगणभेदी घोषणांनी विधानभवन दणाणले

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या सरकारचं हे पहिले पावसाळी अधिवेशन, पायउतार झालेले कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. आज त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून क्रिएटिव्ह अशी रचनात्मक घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओके… या सरकारचं …

Read More »

सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणाले, धनुष्यबाण विषयीचा निर्णय आम्ही घेऊ उध्दव ठाकरेंना दिलासा; निवडणूक आयोगाला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यास आता १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. शिंदें गटाकडून आता शिवसेनेवर दावा करण्यात येत असताना आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाकडून …

Read More »

हिंदूत्वासाठी बाहेर पडलेल्या मंत्र्यांची खाते वाटपानंतर अवस्था “आगीतून उठून फुफाट्यात”? खाते वाटपावरून धुसफूस

हिंदूत्वाचे कारण पुढे करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात सेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या ४० आमदारांपैकी ९ जणांना नुकतेच मंत्री पदाची लॉटरी लागत खात्यांचे वाटप झाले. मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असताना जी खाती होती. त्यापेक्षा कमी दर्जाची तर काही जणांना तीच खाती पुन्हा मिळाल्याने या हिंदूत्वादी …

Read More »