Breaking News

आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, “चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका…” शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांचं जळगावात वक्तव्य

“काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते, अश्या चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय.” असं म्हणत शिव संवाद यात्रेसाठी जळगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे बॅनर फडणाऱ्या नतदृष्टांवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलाय.

राज्यात सुरू असलेलं घाणेरडं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे का ? तुमच्या आमदारांची गद्दारी केली ते तुम्हाला मान्य आहे का ? हेच तुम्हाला विचारायला आलोय, सांगायला आलोय असं म्हणत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जळगावात शिवसैनिक आणि नागरिकांना संबोधित केलं. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राचं सरकार पाडून गुवाहाटीला जिथे ओला दुष्काळ होता, तिथे तुम्ही मजा मारत होता. ४० जण गद्दारी करून गेले, ते स्वतःसाठी गेले, जनतेसाठी नाही. ५० थर लावले बोलतायात, ५० थर नाही ५० खोके लावलेत तुम्ही, एवढे खोके म्हणतात पण लोकांमध्ये ते आले का? नवीन काही घडलंय का? जनतेसाठी काही आलंय का? गेलेल्यांना काय मिळालं? उलट आधी चांगली खाती तरी होती. तुमच्या माथ्यावर गद्दारीच कलंक कायम राहणार. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही’.

 गद्दारी करून तिकडे गेले, काय मिळालं  ? बाबाजीका ठुल्लू !

जळगाव मधील पाचोऱ्यात आज आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेशी शिव संवाद साधला. भर पावसात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना ‘महाराष्ट्रात कट रचलाय शिवसेनेला संपवण्याचा, आम्हाला एकटे पडण्याचा. तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का ?’ असा प्रश्न जळगावकरांना करताचा उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांनी घोषणा देत आपला पाठिंबा कायम सोबत असल्याचं दाखवून दिलं .

पाचोऱ्यातील सभेत बोलताना ‘महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी झाली. आणि गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे, आणि त्यांना ठाऊक आहे कोण विकास कामं करतं, खरं बोलतं, आणि कोण खोटं बोलतं ते. देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. त्यामुळे हे गद्दारांचं हे बेकायदेशीर सरकार लवकरचं कोसळणार म्हणजे कोसळणार’ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

हिंदुहृदयसम्राटांचे त्यांच्यात विचार असते, तर आसाम मध्ये पूर आला तिथे मदत करायला गेले असते. पण मजा मारत बसले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

प्रत्येक गद्दाराच्या मतदार संघात जाऊन गदाराबद्दल सांगणार म्हणजे सांगणार – आदित्य ठाकरे

‘सरकार गेल्याच दुःख नाही, ते परत आणाल तुम्ही. पण प्रगतिशील महाराष्ट्र रोखण्याच काम यांनी केलं. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याच काम उद्धव साहेबांनी केलं, याचं जगाने कौतुक केलं .महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल म्हणून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारं आपलं हिंदुत्व आहे. देशात आपलं नाव होत होतं हेच त्यांच्या पोटात दुखलं असा आरोपही त्यांनी केला.

बंड करायला हिम्मत लागते, यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं. गुवाहातील गेल्यावर ४० गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते, मजा करत होते, पण तिथला पूर त्यांना नाही दिसला. हिंदुत्वासाठी गेले नाही, एक दोन लोकांच्या स्वार्थासाठी गेले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या सुपुत्राने राजीनामा दिला, तेव्हा टेबलावर चढून बार मधे नाचतात तसे हातवारे करत नाचत होते. उद्धव साहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा या ४० जणांनी काम करण्या ऐवजी आपलं सरकार उभारायची स्वप्न पाहिली, कोणी आपल्या आई वडील वा गुरू बाबत असे करेल का ? स्वतःला खोके कसे मिळतील ? स्वतःच ओके कसं होईल ते पाहत होते हे ..पहिली गद्दारांनी बॅच गेली, त्या पैकी किती जणांना मंत्री पद मिळाले ? आपल्याकडे याना चांगलं पद दिली होती, तिकडे जाऊन काय मिळालं ? हीच त्यांची लायकी होती अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *