Breaking News

Tag Archives: shivsena

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना वेदांताबाबत आणि या प्रकल्पाबाबतही माहिती नाही

परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजकारण चालूच राहील मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीवर लक्ष देणे गरजेचे आहे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी वेदांता प्रकल्प परत आणू सांगितले तसेच एअर बस प्रकल्प आणूच. परंतु वेंदांता बद्दल जस माहिती नव्हतं तसचं एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही …

Read More »

आदित्य ठाकरेंचा टोलाः गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत

राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतीच्या शेती वाहून गेलेली असताना राज्य सरकार मात्र उत्सवांमध्ये व्यस्त आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशातच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे …

Read More »

अरविंद सावंतांचा सवाल, निवडणूक आयोग बंद असताना त्या बातम्या कशा आल्या?

मागील तीन-चार दिवस दिवाळीची सुट्टी असताना सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ८.५० लाख प्रतिज्ञापत्रे फॉलमेटनुसार नसल्याने रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना …

Read More »

ऐन दिवाळीत ठाकरे गटाचे किर्तीकर आणि शिंदे गटाच्या कदम यांची भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण बाहेर पडले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत: ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ऐन दिवाळीची धामधुम …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, आनंदाचा शिधा म्हणजे कुचेष्टाच

आधीच महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी या वस्तू पोहचल्याच नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा ही सामग्री मिळाली नसल्याने विरोधकांकडून …

Read More »

त्या चर्चेवर शिंदे गट म्हणतो, तुमच्याकडचे आमदार सांभाळा उध्दव ठाकरे गटावर साधला निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपली सत्ता कशी येईल याचे डावपेच आखत सत्तांतर घडवण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील आमदारांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, उध्दव ठाकरेंना दिवाळी शुभेच्छा दिल्या नाहीत पण जरूर देऊ उध्दव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार का? राजकारणात काहीही अशक्य नाही

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही …

Read More »

शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल, १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही

शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिंदे-फडणवीस सरकारची ही पहिलीच दिवाळी होत आहे. यापार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. या वेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही, असा संकल्पच जाहिर केला. शंभूराज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही ही एक सामना खेळलो…

काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटात न्यायालयीन संघर्ष पाह्यला मिळाला. त्यापाठोपाठ ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरूनची लढाई ही न्यायालयात पोहोचली. मात्र न्यायालयाने शिंदे गटालाही परवानगी दिली. त्यानुसार ठाण्यात एकाबाजूला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तर दुसऱ्याबाजूला शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे …

Read More »

अरविंद सावंत यांचा शिंदेंवर निशाणा, ते मैदानात राहुन लढले उगाच तुलना करू नका औरंगाबाद दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर टीका करणाऱ्याना प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंवर पलटवार

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा करत तेथील शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची मदत करा अशी मागणीही त्यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजपाबरोबर शिंदे गटाकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यातच आज …

Read More »