Breaking News

त्या चर्चेवर शिंदे गट म्हणतो, तुमच्याकडचे आमदार सांभाळा उध्दव ठाकरे गटावर साधला निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपली सत्ता कशी येईल याचे डावपेच आखत सत्तांतर घडवण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील आमदारांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आता शिंदे गटाचे २२ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. त्यावर आमची भाजपाशी २५ वर्षापासुनची मैत्री आहे तर त्यांच्याकडे असलेले आमदार संभाळावेत असा टोला शिंदे गटाने लगावला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला की, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे १०० दिवस नुकतेच पार पडले. मात्र या सरकारमध्ये सर्वकाही ऑलबेल आहे असे काही दिसत नाही. शिंदे गटाचे २२ आमदार नाराज असून ते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ते २२ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा मुळ शिवसेना असलेल्या अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना भलतेच उधाण आले.

राजकीय चर्चेतील या उधानावर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आमचे २२ नव्हे तर ५० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपासोबत आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेना गटाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात खोचक टीका त्यांनी केली. तर त्यांनी त्यांच्याकडे राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच असा दावा केला केले जात आहे असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यात नुकताच झालेल्या ग्रामपंचायतींच्या आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करून घेतील हे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदेंचे काय होणार? एकनाथ शिंदे यांनी स्वत:बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाही अशी टीका ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून करण्यात आली.

तसेच एकनाथ शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजपा स्वत:चे राजकारण करीत राहील. भाजपाचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल, त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत दिसतील. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदेंचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत. पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे. कारण, त्यांच्या चाळीस आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व साताऱ्यातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनास अवतरले. मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो असंही ठाकरे गटानं आरोप केला. ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामध्ये काही तथ्य नसल्याचे यावेळी तरी दिसून येते.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *