Breaking News

Tag Archives: shivsena

अद्वय हिरे म्हणाले, भाजपा नेत्यांच्या सततच्या आठवणीमुळे अखेर फोन बंद करावा लागला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे म्हणाले, भाजपाचे जे नेते इतक्या दिवस माझी आठवण …

Read More »

शरद पवारांवरील आंबेडकरांच्या आरोपावर राऊतांचा बचाव तर पाटील यांच्याकडून अप्रत्यश दुजोरा शरद पवार भाजपाच्या संपर्कात संशय वाढला

राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्याचे नुकतेच जाहिर केले. वंचितचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत झालेला नसतानाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेते शरद पवार हे भाजपाबरोबर होते, आणि आजही भाजपासोबत असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकरांच्या या आरोपनंतर ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

उध्दव ठाकरेंनी ठाण्यात साधला मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा, मात्र आनंद आश्रमात जाणे टाळले ठाण्यातील आरोग्यासाठी लवकरच परत येणार असल्याचा शिंदे गटाला दिला इशारा

राज्यात शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर या फुटीचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज पहिल्यांदाच आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, निष्ठेच्या पाघंरूणाखाली काही मिंधे लपले होते. अस्सल कडवट शिवसैनिक असा विकला जाऊ शकत नाही अशी खोचक टीका एकनाथ शिंदे …

Read More »

सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर, फडणवीसजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला अधिकार किती? तुम्हाला माहित फडणवीसांनी केलेल्या आरोपावरून अंधारे यांची टीका

काल मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकण्याची सुपारी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती असा आरो केला. फडणवीस यांच्या या आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावल्यानंतर ठाकरे गटाच्या …

Read More »

संजय राऊत म्हणाले, पिंपरीची जागा शिवसेना तर कसबा पेठेचा निर्णय दोन्ही काँग्रेस घेतील पुण्यातील पोट निवडणूकीबाबत संजय राऊत यांची माहिती

कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडून अर्थात राष्ट्रवादीकडून लढविण्याची तयारी सुरु असताना पिंपरी-चिंचवडची जागा शिवसेना लढविणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. …

Read More »

दावोसमध्ये मुख्यमंत्री शिंदे नेमके ७६ की २८ तास उपस्थित? केसरकर-सामंताच्या दाव्यात विसंगती आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातील उपस्थितीबाबत मंत्र्यांच्या दाव्यात विसंगती

दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर स्वित्झर्लंडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे गेले होते. दावोस येथून परतल्यानतर मुख्यमंत्री शिंदेंनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. मात्र या गुंतवणूकीबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी तेथे जावून नेमके किती तास काम …

Read More »

दावोसवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, ३३ देशांना मेल पाठवला असता तरी कळले असते… अबब! मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये २८ तासांत ४० कोटींचा खर्च

शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून खोचक टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्याला गेले होते. मात्र दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांना विचारले तर ते सांगतात आम्ही मोदींची …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, शिवसेना – वंचित युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर भूमिका मांडू...

शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच किंवा सुपारी त्यावेळचे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस …

Read More »

उध्दव ठाकरे यांची तैलचित्रावरून टीका, चांगली गोष्ट, मात्र तुमचा हेतू वाईट पवारांचे फोनवरून मार्गदर्शन घेतो, मग आम्ही काय करत होतो?

आगामी मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत शिंदे-फडणवीस सरकारकडून आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना पक्षमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र बसविण्यात आले. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »