Breaking News

उध्दव ठाकरे यांची तैलचित्रावरून टीका, चांगली गोष्ट, मात्र तुमचा हेतू वाईट पवारांचे फोनवरून मार्गदर्शन घेतो, मग आम्ही काय करत होतो?

आगामी मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत शिंदे-फडणवीस सरकारकडून आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना पक्षमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र बसविण्यात आले. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, सध्या देशात वडील चोरणारी औलाद फिरत आहे, असं मी दसरा मेळाव्यात म्हटलं होतं. दुसऱ्यांचा वडील चोरता-चोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर त्यांना विसरायचे, अशी बोचरी टीका करत ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचे तैलचित्र लावताय चांगली गोष्ट आहे. मला अभिमान आहे. मात्र तुमचा हेतू वाईट असल्याचा उपरोधिक टोला शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर आणि सुभाषबाबुंचा जन्मदिवस आहे. आज विधानभवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला दुपारी तैलचित्राबद्दल विचारलं, तेव्हा मी म्हटलं मी अजून तैलचित्र बघितलं नाही. ज्या कलाकाराने चित्र चितारलं असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही, पण हे चित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ दिला का? हे विचारणं गरजेचं आहे. घाई-गडबडीत काहीतरी रंगवून ठेवायचं आणि म्हणायचं ‘हे घे तुझे वडील’ असं अजिबात चालणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, दसरा मेळाव्यात ‘वडील चोरणारी औलाद’ असा उल्लेख मी केला होता. आता दुसऱ्यांचे वडील चोरता-चोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर ते तुम्ही विसरायचे. वडील कोण? असं विचारलं तर ‘काय माहिती’ म्हणाल. कारण इकडे शिवसेनाप्रमुखांचे विचार, तिकडे ‘मोदी का आदमी’, काल म्हणाले शरद पवार ‘गोड माणूस’ आहे. तुम्ही नक्की कुणाचे फोटो लावणार आहात? असा सवाल विचारला.

उध्दव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले, म्हणून सरकार पाडलं असं सांगितलं. पण आता हेच काल सांगतात शरद पवार खूप गोड माणूस आहे. मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र लावत आहात, तुमची कृती चांगली आहे. मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. पण तुमचा त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Check Also

काँग्रेसची ४ थी ४६ लोकसभा उमेदवारांची यादी जाहिरः महाराष्ट्रातील चार उमेदवार

लोकसभा निवडणूकीतील पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेची सुरुवात झालेली असताना काँग्रेस आणि भाजपाकडून अद्याप उमेदवारांची यादी अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *