Breaking News

ऐन दिवाळीत ठाकरे गटाचे किर्तीकर आणि शिंदे गटाच्या कदम यांची भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण बाहेर पडले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत: ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ऐन दिवाळीची धामधुम असताना गजानन किर्तीकर हे शिंदे गटाच्या रामदास कदम यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याने शिवसेनेच्या वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली.

दरम्यान, शिवसेना खासदार गजानन किर्तीकर मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानात आणि शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, ती चूक पुन्हा नको, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर किर्तीकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होते.

या भेटीबाबत रामदास कदम म्हणाले की, चार दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर माझ्याकडे आले होते. मराठी माणसाला नोकरी देण्यासाठी गजानन किर्तीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, ते उध्दव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची साथ सोडत, भाजपाबरोबर युती करावी. बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातील भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडावी. गजानन किर्तीकर शिंदे गटात आले, तर त्यांचं स्वागत आहे, असेही म्हणाले.

ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद केले आहेत. त्यावर रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकडीमुळे असं होत राहणार. आता तरी उद्धव ठाकरेंनी यातून शिकावे आणि त्यांना बाजूला करता आले तर करावे. प्रतिज्ञापत्र बाद झाल्याने एकनाथ शिंदे यांना ‘धनुष्यबाण’ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपालांकडून नारळ

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपाल व्ही. सक्सेना यांनी २ मे रोजी दिल्ली महिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *