Tag Archives: heavy rain

हवामान खात्याचा इशारा, चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस पडणार २६ ते २८ ऑक्टोंबर दरम्यान येणार

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले एक दबाव तीव्र चक्री वादळात तीव्र होऊन २८ ऑक्टोबर रोजी मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यानच्या काकीनाडाभोवती आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार. चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे की, हवामान प्रणाली पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे आणि २६ ऑक्टोबरपर्यंत खोल दाबाच्या पट्ट्यात, २७ …

Read More »

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार.. शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती …

Read More »

मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी विभागातील कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे  यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …

Read More »

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परः फोन नंबर जाहिर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर …

Read More »

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एकूण ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित २ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर

१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास …

Read More »

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, संकटकाळात शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी मुख्यमंत्र सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

काँग्रेसची हाक, कोल्हापुरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया.. आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूरकरांना केले. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी …

Read More »

शरद पवार यांची चिंता, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उधवस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, असे आवाहन …

Read More »