Breaking News

Tag Archives: cm fadnavis

भाजप सरकारचा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हेतर ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ जरी आयोजन केलेले असले तरी या सरकारने यापूर्वीच ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ निर्माण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सोमवारी लोणी येथे शिवजयंती समारोहानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी अनेक मुद्यांच्या आधारे सरकारवर जोरदार तोफ डागली. आज संपूर्ण राज्यात …

Read More »

भारत- महाराष्ट्र हे चुंबकीय देश आणि राज्य मँग्नेटीक महाराष्ट्रातील उद्योजकांची मते

उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी साब इंडियाचे अध्यक्ष जेन वाईडस्ट्रॅाम म्हणाले की, गुंतवणूकीच्या दृष्टीने खरेच हे चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय देश,चुंबकीय राज्य आणि चुंबकीय नेतृत्त्व असा संगम झाला आहे.भारत योग्य अशा मार्गावर वाटचाल करत आहे. साहजिकच महाराष्ट्राचे मार्गक्रमणही तसेच आहे. मेक-इन इंडिया हे धोरण हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असून संशोधन आणि विकासाची वृत्ती …

Read More »

देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य देशातील पहिले ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजीत ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ जागतिक गुंतवणूक दारांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह …

Read More »

पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु असून २०२२ पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त करत राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत आहे. यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. …

Read More »

१० लाख कोटींच्या सामंज्यस कराराचे आदान प्रदान होणार मँग्नेटीक महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागात राहणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे. …

Read More »

…आणि सक्रिय झालेले भाजप कार्यकर्त्ये शांत झाले पकोडा वादावर पंतप्रधानांच्या चांगल्या कामाचा प्रचार करणारे निरव मोदी प्रकरणानंतर गप्प

मुंबई : गिरिराज सावंत देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या पकोडा व्यवसायाच्या सल्ल्यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले. त्या तापलेल्या वातावरणाला थंड करण्यासाठी कधी नव्हे ते भाजपचे कार्यकर्त्ये सक्रिय झाले. मात्र काही तासातच पंजाब नँशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आला आणि भाजपच्या …

Read More »

गुन्हा दाखल झालेल्या विझक्राप्ट कंपनीलाच पुन्हा मँग्नेटीक महाराष्ट्रचे काम राज्य सरकारला विसर आपल्याच निर्णयाचा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत गिरगाव चौपटीवर आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनीत आग लागली. त्यामुळे बेशिस्त नियोजन करणाऱ्या विझक्राफ्ट कंपनीला काळ्या यादीत टाकत त्याविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला. मात्र या आपणच दाखल केलेल्या गुन्ह्याचा पूर्ण विसर पडत राज्य सरकारने पुन्हा त्याच कंपनीला …

Read More »

राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर बंदी ? आगामी अधिवेशनात कायदा आणण्याच्या हालचाली

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील बहुतांष जिल्ह्यात हुक्का पार्लरची केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे राज्याची तरूण पिढी बरबाद आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने या सर्वच हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच पार्लरवर बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

बोंडअळीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी केली ३७ शेतकऱ्यांना अटक

औरंगाबाद: प्रतिनिधी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला वेळेत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाच्याविरोधात संतापलेल्या ३७ शेतकर्‍यांनी (बुधवारी) दुपारी १ च्या सुमारास सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. गंगापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन

नागपूर : प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे …

Read More »