Breaking News

१० लाख कोटींच्या सामंज्यस कराराचे आदान प्रदान होणार मँग्नेटीक महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागात राहणार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे.

मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभाग, उद्योग विभाग आणि ऊर्जा विभागासह अन्य काही विभागांसोबत गुंतवणूकदारांकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. यातील गृहनिर्माण विभागाने एमसीएचआय-क्रेडाई, नँरडँको, हिरांनंदानी आणि अन्य बांधकाम व्यावसायिक कंपन्यासोबत २ लाख ५० हजार कोटी रूपयांचे एमओयु करण्यात येणार आहेत. तसेच यातून ७ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून ही सर्व घरे परवडणाऱ्या दरातील घरे राहणार आहेत.

त्यानंतर उद्योग विभागाच्यावतीने परदेशीस्थित एका कंपनीसोबत सामंज्यस करार करण्यात येणार असून या कंपनीसोबत करण्यात येणारा करार हा सर्वाधिक मोठ्या रकमेचा आहे. उद्योग विभागाकडून करण्यात येणारा हा गुंतवणूकीचा करार हा ३ लाख कोटींचा करार आहे.

तर त्यानंतर ऊर्जा विभागाकडून अपारंरीक क्षेत्रातील ऊर्जा निर्मितीसाठी १ लाख ६० हजार कोटी रूपयांचे सामंज्यस करार करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने अदानी ग्रुप, रिन्यु पॉवर व्हेन्चर पॉवर व्हेनचर प्रा.लि., टाटा पॉवर कंपनी, सॉफ्ट बँक एनर्जी, युनिव्हर्जी थिंक ग्रीन प्रा.लि., टोरंट पॉवर, टेक फेडरल इंटर नँशनल जनरल ट्रे., वारी एनर्जीज लिं. यासह १६ कंपन्यांशी सामंज्यस कराराचे आदान प्रदान करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या सर्व कंपन्यांशी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एमओयुवर सह्या करण्यात आले आहेत. फक्त त्याच्या करारांचे आदान-प्रदान या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे.

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

One comment

  1. Good web site you have got here.. It’s hard to find excellent writing like yours these days.
    I honestly appreciate individuals like you! Take care!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *