Breaking News

औरंगाबाद पाठोपाठ कोपरगावमध्ये भाजप विरोधात राडा श्रीपाद छिदमच्या वक्तव्याचे पडसाद

औरंगाबाद: प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांनी काढले. त्या निषेधार्थ काल औरंगाबादेत भाजपचे कार्यालय फोडल्यानंतर आज कोपरगांव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्याने तेथे वातावरण तणावग्रस्त बनले.

दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी काल औरंगाबादेत संध्याकाळी साडेपाच वा.(शक्रवारी) चार मोटरसायकलवर बसून आठ जणांच्या टोळक्याने उस्मानपुरा भागातील भाजपा कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाचा दरवाजा लाथेने तोडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी वेंदांतनगर पोलिसांना दिली.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार द्यायची की नाही याबाबत पक्षाचा निर्णय होईल असे भाजपा प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी स्पष्ट करत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीपाद छिंदम याने असभ्य भाषेत मनपाचा कर्मचारी अशोक बिडवे याला प्रभागातील कामे का होत नसल्याचे विचारले. यावर बिडवे याने शिवजयंतीमुळे उशीर होत असल्याचा खुलासा करताच छिंदमने छत्रपती शिवाजी राजांबद्दल अपशब्द वापरले. अवघ्या तीन दिवसांवर शिवजयंती आली असतांना पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यांकडून असे वागणे दुर्देवी असल्यामुळे छिंदमची हकालपट्टी करण्यात आली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *