Breaking News

…आणि सक्रिय झालेले भाजप कार्यकर्त्ये शांत झाले पकोडा वादावर पंतप्रधानांच्या चांगल्या कामाचा प्रचार करणारे निरव मोदी प्रकरणानंतर गप्प

मुंबई : गिरिराज सावंत

देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या पकोडा व्यवसायाच्या सल्ल्यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले. त्या तापलेल्या वातावरणाला थंड करण्यासाठी कधी नव्हे ते भाजपचे कार्यकर्त्ये सक्रिय झाले. मात्र काही तासातच पंजाब नँशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आला आणि भाजपच्या गोटात एकदमच शांतता पसरल्याचे चित्र निर्माण झाले.

बेरोजगार सुशिक्षित तरूणांनी नोकरीची वाट न पाहता पकोडे विकण्याचा व्यवसाय सुरु करावा असा सल्ला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिला. त्यावरून सर्वच विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यात भरीस भर म्हणून सर्वसामान्य जनतेकडूनही सोशल नेटवर्किंग साईट्सवर मोठ्या प्रमाणावर याबाबत उलट सुलट चर्चा सुरु केली. त्यामुळे भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होत असलेले डँमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यालयातून सर्व पक्ष कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती देण्यारे मेसेजस जनतेत पसरविण्याचे आदेश देण्यात आले. त्या आदेशानुसार ऐरवी कुणाचे व्हाट्सअपचे साधे मेसेजही न पाहणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वांचे मेसेजेस पाहून पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामाची यादीच प्रत्येकाला पाठवायला सुरुवात केली.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या व्हॉट्सअपवर पंतप्रधान मोदी यांनी मागील तीन वर्षात केलेल्या कामाची माहिती झळकू लागली. तसेच त्यांच्या सुमधूर हास्याचे फोटोग्राफही प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसू लागले. त्यामुळे भांबावलेल्या नागरीकांना क्षणभर पंतप्रधानांच्या चांगल्या कामाची इतकी चांगली माहिती कशी काय? येवू लागली असा प्रश्न पडायला लागला. मात्र क्षणभरात प्रसारमाध्यमातील पकोडे व्यवसाय करण्यावरून दिलेल्या सल्ल्याचे वृत पाहून नागरीक काय समजायचे समजून गेले आणि भाजप कार्यकर्त्ये-पदाधिकाऱ्यांकडून पाठविण्यात येत असलेल्या मेसेजचा अर्थ समजून आला.

पकोडे प्रकरणावरून भाजपचे सर्व कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी मोबाईलवर सक्रिय होवून काही तासांचा अवधी लोटला नाही. तोच प्रसिध्द हिरे व्यापारी निरव मोदी जे पंतप्रधान मोदी यांच्या खास गोटातील म्हणून ओळखले जातात. त्यांचा पंजाब नँशनल बँकेत केलेला ११ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आणि सक्रिय झालेले भाजप कार्यकर्त्ये एकदम थंडगार गोषात गेले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून एकही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कामाची पोस्ट पुन्हा व्हायरल झाली नाही.

 

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *