Breaking News

दिग्दर्शनाच्या मैदानात रिचा कॉमेडी लघुपटाचे करणार दिग्दर्शन

मुंबई : प्रतिनिधी

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटापासून ‘फुक्रे’ चित्रपटापर्यंत अभिनेत्री रिचा चढ्ढाने कायमच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. नॅान-ग्लॅमरस भूमिकाही ग्लॅमरस भूमिकांइतक्याच दमदार आणि लक्षवेधी पद्धतीने साकारण्याची कला रिचाला चांगलीच जमते. याच कारणांमुळे रिचाच्या भूमिका असलेल्या चित्रपटांनी कान सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्येही आपला दबदबा निर्माण केला होता. आजवरच्या प्रवासातील अनुभवाच्या बळावर रिचा आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

होय, रिचा आता दिग्दर्शनाच्या मैदानात उतरली असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. मल्टी टॅलेंटेड अभिनेत्री असा नावलौकीक असलेली रिचा एक उत्तम लेखिका आहे. लवकरच ती गायिकेच्या रूपातही रसिकांना भेटणार आहे. इतकंच नव्हे तर तिच्यातील दिग्दर्शिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पदार्पणात थेट एखाद्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याऐवजी लघुपटाद्वारे रिचाने दिग्दर्शनाच्या मैदानात छोटी उडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप शीर्षक निश्चित झालं नसलेला हा लघुपट कॅामेडी असून, सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा असल्याचं समजतं. विशाखा सिंग या लघुपटाचे निर्मिते आहेत. अली फझल, विनोदी अभिनेता अदार मलिक आणि सत्यजीत दुबे आदी कलाकारांच्या भूमिकांमुळे हा लघुपट एक वेगळ्याच उंचीवर जाईल यात शंका नाही. रिचाने यापूर्वी लघुपटाची निर्मिती केली आहे, पण दिग्दर्शन करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. या लघुपटात रिचा २०२५ वर्षातील झलक दाखवणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भविष्यात जेव्हा भाज्या खूप महाग होतील, तेव्हा समाजात कशा प्रकारचं चित्र पाहायला मिळू शकतं हे या लघुपटात दाखवण्यात आलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *