Breaking News

आणखी एका वृध्द महिलेचा मंत्रालयाच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न वृध्द महिलेस सेंट जॉर्ज रूग्णालयात केले दाखल

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई : प्रतिनिधी

गतीमान राज्य सरकारच्या धिम्या कारभाराला कंटाळून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या व्यक्तींकडून आत्महत्या करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात मंत्रालयात तीन आत्महत्येचे प्रयत्न झाले. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मंत्रालयाच्या समोर साधारणत: ६० ते ६५ वयोगटातील वृध्द महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेचे नाव श्रीमती सखुबाई विठ्ठल झालटे असे असे असून त्या वडगाव पंगु तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील आहेत.

त्यांच्या कुटुंबात जमिनीचा आपसी वाद आहे. त्यांचे सासरे भिका लक्ष्मण झाल्टे यांची ३ हेक्टर ५७ आर इतकी जमीन आहे. १९४७ पासून त्यांचे आपसात कुटुंबात चुलत घराण्याशी या जमिनीच्या हिस्से वाटणीचे वाद आहेत. ७-१२ वर दोन्ही गटांचे नावे आहेत. दुसरा गट हा सुनील वाल्मिकी झाल्टे वगैरे आठ लोकांचा आहे. दरम्यान हा वाद सरकारकडे गेला. प्रांत अधिकारी यांनी या महिलेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे जमिनीचा ताबा देण्यासाठी संपूर्ण पोलिस बंदोबस्त देण्यात आला. दरम्यान, दुसऱ्या गटाने अपील केल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती दिली होती. मात्र, तरीही जमिनीचा ताबा हवाच, अशी त्यांची मागणी आहे. वडगाव पंगु गट क्रमांक २५० येथे ही जमीन आहे.

या कामासाठी सदर महिला मंत्रालयात आली होती. मात्र मंत्रालयातून बाहेर पडताच तीने तीच्या जवळ असलेल्या एका छोट्या बाटलीत असलेले विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंत्रालयाच्या गेटवर असलेल्या पोलिसांनी आणि रस्त्यावरील काही नागरीकांनी त्या महिलेला तातडीने टँक्सीत घालून सेंट जॉर्ज रूग्णालयात नेले. यावेळी तिच्यासोबत तीचा ३५ वर्षे वयाचा मुलगाही सोबत होता. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *