Breaking News

Tag Archives: cm fadnavis

अनुवाद प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी

मुंबई :  प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले. विधिमंडळ सदस्यांच्या संयुक्त बैठकीपुढे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण संपल्यानंतर त्यावरचे पडसाद विधान परिषदेत कामकाज सुरू होताच उमटले. कामकाजाला सुरूवात होताच …

Read More »

राज्यपालांच्या भाषण अनुवाद वाचनाचे १० हजार कोणाला? श्रीपाद केळकर कि शिक्षण मंत्री तावडे यांना

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषण होते. या अभिभाषणाचा अनुवाद वाचण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला पाचारण करून त्याच्या तोंडून अनुवादीत भाग वाचला जातो. मात्र राज्यपालांचे अनुवादीत अभिभाषण वाचण्यासाठी बोलविण्यात आलेल्या श्रीराम केळकर ऐवजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी वाचन केल्याने अनुवाद वाचणाऱ्या …

Read More »

कर्जावरील व्याज भरण्यासाठी २१०० कोटींची पुरवणी मागण्यात तरतूद अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ हजार ८७१ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई: प्रतिनिधी राज्यावरील वाढता कर्जाचा डोंगर, महसूली उत्पन्नातील कमतरता आणि शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम उभी करता राज्य सरकारला चांगलेच नाकी नऊ आलेले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच थकीत कर्जावरील २ हजार १२९ कोटी रूपयांची व्याजाची रक्कम भरण्यासह इतर काही विभागांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »

मे २०१८ पर्यंत १५ हजार गावे दुष्काळ मुक्त करणार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून आगामी मे २०१८ पर्यंत राज्यातील आणखी १५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचा दावा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर अभिभाषण करताना …

Read More »

विरोधकांच्या सवालाला मुख्यमंत्र्यांचा जवाब अर्थसंकल्पिय अधिवेशनासाठी राज्य सरकार तयार

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा देणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्या सोमवार पासून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत विरोधकांनी वारेमाप आरोप केले. राज्य सरकारच्यावतीने  विरोधकांच्या आरोप वजा सवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवाब देत आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मलबार हिल येथील  सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधाऱ्यांच्या …

Read More »

उद्यापासून राजकिय वातावरण तापायला सुरुवात होणार सोमवारपासून अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा दाखविणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व विरोधी पक्षांची रविवारी दुपारी एक बैठक होत असून त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असला तरी राजकिय वातावरण …

Read More »

घरांसाठी करार करणाऱ्या सरकारकडून दोन वर्षात एक वीटही नाही रचली २१० कोटी रूपयांपैकी फक्त ५ कोटींचा खर्च

मुंबई: प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरीकाला स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली प्रत्येकाला घर देण्याची घोषणा ९ डिसेंबर २०१५ रोजी केली. मात्र या घरांच्या निर्मितीसाठी मागील दोन वर्षात दोन वेळा विविध बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करणाऱ्या राज्य सरकारने स्वत:च्या गृहनिर्माण क्षेत्रातील म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून …

Read More »

निवडणुकीचा निधी जमा करण्याकरीता नगरविकास खाते चालविले जात आहे का? आराखडा तयार असतानाही अधिसूचनेचे मसूदे काढले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप

 मुंबई : प्रतिनिधी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०३४ सालापर्यंतचा विकास आराखडा सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहा महिन्यात तो मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रक नियमावलीमध्ये बदल करणा-या अधिसूचनांच्या मसुद्याचा या सरकारने सपाटाच लावलेला आहे. सदर प्रस्तावित बदल बिल्डरांचे उखळ पांढरे …

Read More »

केंद्राच्या निधीतून राज्यात ४ लाख कोटींची कामे पूर्ण केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरींची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची …

Read More »

बस, लोकल रेल्वे, मोनोचा प्रवास आता एकाच तिकिटावर एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात कामाच्या निमित्ताने बस, लोकल रेल्वे आणि मोनोने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना वेगवेगळे तिकिट काढावे लागते. त्यात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने या सर्व वाहतूक व्यवस्थेचे एकाच कार्डावर तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी एकात्मिक तिकिट …

Read More »