Breaking News

विरोधकांच्या सवालाला मुख्यमंत्र्यांचा जवाब अर्थसंकल्पिय अधिवेशनासाठी राज्य सरकार तयार

मुंबई : प्रतिनिधी

राज्याला आर्थिक दिशा देणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्या सोमवार पासून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत विरोधकांनी वारेमाप आरोप केले. राज्य सरकारच्यावतीने  विरोधकांच्या आरोप वजा सवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवाब देत आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

मलबार हिल येथील  सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ कर्जमाफी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यत ५४ लाख ७२ हजार ३११ शेतकऱ्यांची कर्जमाफी खाती अंतिम करण्यात आली असून त्यापैकी ४६ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. यातील ३० लाख पूर्ण कर्जमाफीची खाती आहेत. तर १६ लाख खाती ही प्रोत्साहनपर कर्जाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच ही कर्जमाफीची योजना शेवटच्या शेतकऱ्यांला लाभ मिळे पर्यंत सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले आहेत. तसेच त्याच्या मदत वाटपासही सुरुवात करण्यात आल्याचे सांगत ओखी वादळग्रस्तांना मदत देण्याची कारवाई सुरु झाल्याचे सांगत बोंडअळी व तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार असून ही नुकसान भरपाईची रक्कम एसडीआरएफ मधून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत देण्याकरीता २ हजार ४५० कोटी रूपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांनी शिवजयंतीला जाहीरात दिलेली नसल्याबाबतचा विरोधकांनी केलेला विरोधकांच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात आघाडी सरकारच्याच काळात मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. त्याच तत्वांचे पालन आम्ही करत असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला जाहीरात देण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगून टाकले.

त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या आर्शिवादाने हे सरकार आल्याने त्यांच्याप्रती आमच्या मनात अपार आदर असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

याशिवाय मंत्रालयात होत असलेल्या आत्महत्याबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक आत्महत्या ही आम्ही गांर्भीयाने घेत आहोत. विशेषत: धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या ही आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच केली असल्याचे सांगत इतरांकडूनही कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी बसविण्यासाठी अशा पध्दतीची पावले उचलली जात आहेत. त्यास प्रसार माध्यमांनी फार प्रसिध्दी देवू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु होत असून या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने अर्धा टक्का व्याज दराने कर्ज उपलब्द करून दिले आहे. मात्र त्याची परतफेड ५० वर्षे आपल्याला करावी लागणार नसून ती परतफेड केंद्र सरकारच करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी विरोधक हे सत्तेपासून दूर गेल्याने त्यांना वैफल्य आले असल्याने त्यांच्यात नैराश्य दाटून आले आहे. त्यामुळे ते सत्तेत येण्यासाठी अशा पध्दतीचे आरोप करत आहेत. मात्र विरोधी पक्षात बसून आणखी खूप काही शिकायचे असल्याने नकारात्मक विरोधकातून सकारात्मक विरोधक होण्याचा उपरोधिक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

व्याज आकारणाऱ्या बँकावर बरखास्तीची कारवाई

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतरही केवळ कर्जाची रक्कम जमा झाली नसल्याचे कारण पुढे करत काही बँकांकडून कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजाची आकारणी करत आहेत. यासंदर्भात बँकाना यापूर्वीही सांगण्यात आले आहे. तरीही अशा बँकाकडून व्याजाची आकारणी सुरुच राहीली तर बँकेवर बरखास्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

 

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *