Breaking News

Tag Archives: cm fadnavis

पाच वर्षातल्या ६० लाख रोजगारांची यादी जाहीर करा ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. भाजप-शिवसेना …

Read More »

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या पंकजा मुंडे साडेचार वर्षात अनेक पुरस्कारांनी ग्रामविकास, महिला व बाल कल्याण विभागाचा गौरव

मागील साडेचार वर्षांपासून ग्रामीण विकासाला अधिक चालना मिळत आहे. ग्रामसडक योजना, रस्ते बांधणी असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल, एका बाजूस राज्यातील ग्रामविकासाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील कुपोषण कमी करण्याबरोबरच त्याच्या समूळ उच्चाटनासाठीही प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिला सक्षमीकरणासाठीही अनेक योजना आखल्या जात आहेत. त्या योजना …

Read More »

आता प्रत्येकाला एकच घर उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर राज्य सरकारचे धोरण

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये शासकिय योजनेच्या माध्यमातून नागरीकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र अनेक ठिकाणी विशेषतः मुंबईसारख्या शहरात एकापेक्षा अनेक घरे शासकिय योजनेतून मिळविण्याचे प्रकार वाढीस लागेल आहेत. या अशा एकापेक्षा अधिक घर लाभार्थ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यापुढे भविष्यात शासकिय योजनेतून …

Read More »

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आमदार गजभिये आणि प्रविण भोटकर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणाचाच नव्हे तर प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणून मंत्रालय असून या मंत्रालयाच्या इमारतीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले नव्हते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि सामाजिक कार्यकर्त्ये प्रविण भोटकर यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर डॉ. आंबेडकरांचे आणि संविधानाचे प्रस्ताविका बसविण्यात येणार आहे. याचे …

Read More »

पंतप्रधान मोदींनी सांगितले गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण रोखा मीठी नदी प्लास्टीक मुक्त करण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी जर मी तुम्हाला एखादा संकल्प करायला सांगितला तर तुम्ही करणार का? ” अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी जमलेल्या समुदायाला केली. त्यावेळी सगळ्यांनी हो असे उत्तर देताच मोदी म्हणाले, यावर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी प्लास्टिक आणि जलप्रदूषण वाढणवारी सामुग्री समुद्रात जाणार नाही याची काळझी घ्या दिवसेंदिवस जलप्रदुषणात …

Read More »

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या वैभवशाली वारशाचा खेळ करु नका पवित्र गडकिल्ल्यांवर बाजार न मांडण्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टला परवानगी देण्याचा निर्णय संतापजनक आहे. शिवरायांच्या वैभवशाली वारसा स्थळांवर बाजार मांडून मराठी अस्मितेचा अपमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने …

Read More »

रात्रौ १.३० वाजता सापडली मंत्रालयात महिला मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलास तैनात करण्यात आले आहे. मात्र याच सजग पोलिसांच्या तैनातीतही काही दिवसांपूर्वी माहिती चोरी (डेटा चोरी) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रात्री १.३० वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा …

Read More »

राज्यात गुंतवणूकीची गरज मात्र सरकारकडून मोदींच्या प्रतिमा संवर्धनासाठी काश्मीरात रिसॉर्ट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरीता अधिक गुंतवणुकीची गरज आहे. मात्र महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरीता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरीता काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेत जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

काश्मीरात रिसॉर्ट बांधणीसाठी महाराष्ट्र सरकार विकत घेणार जमीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर देशातील कोणत्याही जनतेला जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन त्यावर रिसॉर्ट बांधण्याची योजना असून सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि दुसरे लेहमध्ये रिसॉर्ट बांधण्यासाठी जमिन …

Read More »

अनुसूचित जमातींच्या नागरीकांना जलद मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र अतिरिक्त सात जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्थापनेस मंजूरी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होण्यासाठी पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग …

Read More »