Breaking News

Tag Archives: cm fadnavis

आंध्र प्रदेशला महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्तपणे विरोध करणार मुख्यमंत्री फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे बैठकीत एकमत

मुंबई : प्रतिनिधी कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्यात आज येथे झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट कृष्णा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिसांचे रेट ऑफ कन्व्हीकशन् चे गुपीत एक पोलिस म्हणतो मुद्देमाल सापडला तर दुसरा म्हणतो सापडलाच नाही

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे असते. मात्र मुख्यमंत्री पदाबरोबरच गृह विभागाचा कारभार सांभाळताना राज्यातील गुन्हे सिध्दीचे प्रमाण चांगले असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक वेळा जाहीर केले. परंतु पोलिसांकडून किरकोळ गुन्ह्यातही पुरावे, तपासाची संपूर्ण माहिती, जप्त केलेली मालमत्ता आदी गोष्टी न्यायालयात सादर …

Read More »

मोठा भायने बोलू चे, युती ना करवा छे शिवसेनेने सोबत युती न करण्याचे भाजपा नेत्यांचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबर झटपट युती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच युतीची काळजी विरोधकांनी अथवा प्रसारमाध्यमांनी करू नये असे आवाहनही केले. मात्र निवडणूकीत प्रत्यक्ष शिवसेनेबरोबर कोणत्याही स्वरूपात युती करायची नाही असे स्पष्ट आदेश दिल्लीतील भाजपाच्या मोठा भायने राज्यातील नेतृत्वाला दिल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सुत्रांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, निवडणूकीत लढाई फक्त वंचित सोबतच नांदेड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्य़ाचे वक्तव्य

नांदेड-मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या विरोधकांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्याचे काही तासांपुर्वींच जाहीर करून काही तासांचा अवधी उलटत नाही तोच विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला रामराम ठोकत …

Read More »

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर उपचार घेत असताना १९ वर्षांच्या मुलीचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बलात्काराचा गुन्हा महिनाभरापूर्वी दाखल होऊनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार संताप आणणारा असून स्थानिक पोलिसांची भूमिका पाहता या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

चारा छावण्यांना तात्काळ मुदतवाढ द्या, अन्यथा यात्रा अडवू काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी आज पोळा हा शेतक-यांचा सर्वात मोठा सण आहे. पण दुर्देवाने राज्याच्या काही भागात भीषण दुष्काळी परिस्थीती आहे. मराठवाड्यातल्या शेतक-यांवर तर चारा छावणीत पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत असून पाणी आणि चा-याची भीषण टंचाई आहे. चारा छावण्यांची मुदत उद्या संपत असून सरकारने तात्काळ चारा …

Read More »

एससीच्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक, पण आकडे विश्वासहार्य नाहीत आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातींच्या आर्थिक उन्नती आणि विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा पूर्ण खर्च केलेला नाही. तसेच त्याबाबत दाखविण्यात आलेली आकडेवारी ही विश्वसनीय नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांनी केले. मात्र हे …

Read More »

बलात्कारी लोकांना पाठीशी घालणारे फडणवीस सरकार हाय हाय घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खा. सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

महापालिकेने नोटीस बजाविलेल्या इमारतींचाच पुर्नविकासासाठी विचार राज्य सरकारच्या नव्या धोरणात तरतूद

मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहरातील १४ हजार ८५८ जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचे रखडलेले पुर्नविकासाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. मात्र हा पुढाकार घेतना पुर्नविकास योजनेत समाविष्ठ करताना फक्त मुंबई महापालिकेने ३५४ अन्वये ज्या इमारतींना नोटीस बजाविली अशाच इमारतींचा पुर्नविकास योजनेसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील …

Read More »

१४-१५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नवरात्रीत निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळीत सरकार स्थापन होणार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असून जनतेला खुष करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारला आणखी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने हे सणासुदीचे महिने असल्याने ऐन नवरात्रीत राज्य विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळी नव्या स्थानापन्न होणाऱ्या सरकारला जनतेसोबत साजरी करायला मिळणार आहे. विद्यमान …

Read More »